राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अधिष्ठात्यांना देता येईल सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 05:12 AM2019-10-06T05:12:58+5:302019-10-06T05:15:04+5:30

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना आता राज्यातील कोणत्याही इतर शासकीय महाविद्यालयांत वैद्यकीय सेवा देणे शक्य होणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने हा सकारात्मक निर्णय घेतला आहे.

Services can be provided to the presidents in government medical colleges across the state | राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अधिष्ठात्यांना देता येईल सेवा

राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अधिष्ठात्यांना देता येईल सेवा

Next

मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना आता राज्यातील कोणत्याही इतर शासकीय महाविद्यालयांत वैद्यकीय सेवा देणे शक्य होणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने हा सकारात्मक निर्णय घेतला आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिष्ठाता पदावर कार्यरत असलेले डॉक्टर त्यांच्या विषयांमध्ये तज्ज्ञ असतात, परंतु या पदावरील प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे त्यांना वैद्यकीय सेवा देणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केला जात नाही.
इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय सेवा देण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी घेणे त्यांना बंधनकारक आहे, परंतु आता विभागाने या नियमांमध्ये बदल केला आहे. करण्यात आलेल्या या बदलानुसार आता राज्यातील कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शस्त्रक्रिया करण्याची परवानगी त्यांना दिली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर अधिष्ठातापदी नियुक्ती होते. असे असले, तरी इतक्या वर्षा$ंत आलेला वैद्यकीय अनुभवाचा वापर मात्र अधिष्ठातापदी आल्यानंतर करणे अनेकदा शक्य होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच या ज्ञानाचा, तसेच अनुभवाचा योग्य वापर करत या क्षेत्रातील अन्य विद्यार्थ्यांना शिकविणे, वैद्यकीय शस्त्रक्रिया करणे याची संधी अधिष्ठात्यांनाही मिळणे आवश्यक आहे, या विचारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, आता राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठात्या म्हणून कार्यरत असलेले राज्यातील अन्य शासकीय महाविद्यालयांत वैद्यकीय सेवा देऊ शकतील.

Web Title: Services can be provided to the presidents in government medical colleges across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.