Join us  

डबेवाल्यांची सेवा महागणार

By admin | Published: July 04, 2016 9:33 PM

गेली १२५ हून अधिक वर्षे मुंबईच्या चाकरमान्यांचे डबे पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनीही आता डब्यामागे दरमहा घसघशीत अशी १०० रुपयांची वाढ केली आहे डब्यासोबत पाणी अथवा

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ४ : गेली १२५ हून अधिक वर्षे मुंबईच्या चाकरमान्यांचे डबे पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनीही आता डब्यामागे दरमहा घसघशीत अशी १०० रुपयांची वाढ केली आहे डब्यासोबत पाणी अथवा ताकाची बाटली असल्यास अतिरिक्त १५० रुपये आकारण्यात येणार आहे. हा निर्णय मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळातर्फे घेण्यात आला आहे.गेल्या काही वर्षांत मुंबईत अनेक उद्योगांनी डोके वर काढले. मात्र डबेवाल्यांच्या सेवेत खंड पडला नाही. गेल्या वर्षी केवळ २० ते ३० टक्के वाढ करण्यात आली होती, परंतु मुंबईसारख्या शहरात डबेवाल्यांना एवढ्या कमी उत्पनात भागवणे कठीण जात आहे. मुंबईत जवळपास ५ हजार डबेवाले दिवसाला दोन ते तीन लाख डबे पोहोचवतात. डबेवाल्यांना या सेवेव्यतिरिक्त इतर उत्पन्नाचे साधन नसल्याने महागाईची झळ पोहोचते. त्यामुळे ही वाढ करण्यात आली आहे. डबेवाल्यांची ही दरवाढ जुलैमहिन्यापासून लागू करण्यात आली असून या पगारात ही वाढ आकारण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली.