Join us

मुंबईतील डबेवाल्यांची सेवा मंगळवारी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 2:50 AM

कार्तिकी एकादशीनिमित्त मुंबईतील डबेवाले कार्तिकवारीसाठी आळंदीला निघाले आहेत. त्यामुळे द्वादशीला (बारस) म्हणजेच ४ डिसेंबरला डबेवाल्यांची सेवा एक दिवस बंद राहील, अशी माहिती डबेवाला संघटनेकडून देण्यात आली.

मुंबई : कार्तिकी एकादशीनिमित्त मुंबईतील डबेवाले कार्तिकवारीसाठी आळंदीला निघाले आहेत. त्यामुळे द्वादशीला (बारस) म्हणजेच ४ डिसेंबरला डबेवाल्यांची सेवा एक दिवस बंद राहील, अशी माहिती डबेवाला संघटनेकडून देण्यात आली.कार्तिकी एकादशीनिमित्त मुंबई डबेवाले आपले सोमवारचे काम संपवून सायंकाळी ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र आळंदी येथे जाणार आहेत. मुंबईतील डबेवाले हे पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. एकादशीनिमित्त आळंदीला गेल्यानंतर मंगळवारी बारस सोडूनच ते मुंबईला परतणार आहेत. त्यामुळे मंगळवारी मुंबईच्या चाकरमान्यांना घरचे जेवण मिळणार नाही. पण बुधवारी नियमितपणे डबेवाले आपली सेवा देण्यासाठी तत्पर असतील, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके आणि रामदास करवंदे यांनी दिली.>मुंबईकर सहकार्य करतीलडबेवाल्यांची धार्मिक भावना समजून घेत, मुंबईकर एका दिवसासाठी डबेवाल्यांना सहकार्य करतील, अशी अपेक्षा मुंबई जेवण डबेवाला संघटनेचे प्रवक्ते विलास शिंदे यांनी व्यक्त केली.मात्र, बुधवारी ५ तारखेला डबेवाला आपल्या रोजच्या कामाला रुजू होतील, असेही शिंदे यांनी सांगितले.