मालाडमधील दोन हजार बेडचे जम्बो कोविड केंद्र १५ जूनपर्यंत उभारा - साेनिया सेठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:11+5:302021-06-04T04:06:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एमएमआरडीएची संपूर्ण टीम मालाडमधील दोन हजार बेडचे जम्बाे कोविड केंद्र पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एमएमआरडीएची संपूर्ण टीम मालाडमधील दोन हजार बेडचे जम्बाे कोविड केंद्र पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून, प्रभारी महानगर आयुक्त सोनिया सेठी यांनी बुधवारी सर्व एजन्सींना कामांना गती देण्याच्या व प्रकल्प १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता केंद्र बांधून पूर्ण झाल्यावर महापालिकेच्या स्वाधीन केले जाईल. येथे २ हजार बेड्सपैकी २०० आयसीयू, १४ डायलिसिस युनिट्स तर १५३६ बेडमध्ये ऑक्सिजन पुरवठा आणि ३८४ बेड क्वारंटाइनसाठी आहेत. करमणूक, योग कक्ष आहे. स्वतंत्र पेडिॲट्रिक आयसीयू वॉर्ड आहेत. नातेवाईक किओस्क फॅसिलिटीवरील रुग्णांची माहिती पाहू शकतील.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बीकेसी येथे उभारलेल्या कोविड केंद्राला जवळजवळ वर्ष पूर्ण होत आहे. मुंबई महापालिका हे कोविड सेंटर चालवत आहे. बीकेसीनंतर प्राधिकरण मालाड येथे कोविड केंद्र तयार करत आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली ते उभारले जात असून, याचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना सेठी यांनी दिल्या.
................................................