Join us

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 9:14 AM

मुंबई :येत्या दोन वर्षांत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारायचे असून, त्यासाठी  वैद्यकीय शिक्षण विभागाने तयारी ...

मुंबई :

येत्या दोन वर्षांत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारायचे असून, त्यासाठी  वैद्यकीय शिक्षण विभागाने तयारी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी ४ हजार कोटींचे कर्ज आशियाई बँकेकडून घेतले जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.  

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रकल्पांना आशियाई विकास बँकेमार्फत अर्थसाहाय्य आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेसंदर्भात आढावा बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  

या बैठकीस  मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्तचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, केंद्र शासनाच्या क्षमता बांधणी आयोगाचे सदस्य तथा प्रशासक प्रवीणसिंह परदेशी आणि बँक प्रतिनिधी उपस्थित होते. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीस