पार्किंग समस्येवर ‘सेटबॅक’चा उतारा, वाहनतळाची संख्या अपुरी, इमारतीमधील राखीव जागेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:58 AM2017-11-19T01:58:44+5:302017-11-19T01:58:53+5:30

मुंबईत वाहनांची संख्या वाढत असताना, वाहनतळाची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे रस्त्यावरच गाड्या उभ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका वाहतुकीला बसत असल्याने, वाहनतळांची संख्या वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.

'Setback' transcript on parking problem, no parking number incomplete, use of reserved space in building | पार्किंग समस्येवर ‘सेटबॅक’चा उतारा, वाहनतळाची संख्या अपुरी, इमारतीमधील राखीव जागेचा वापर

पार्किंग समस्येवर ‘सेटबॅक’चा उतारा, वाहनतळाची संख्या अपुरी, इमारतीमधील राखीव जागेचा वापर

Next

मुंबई : मुंबईत वाहनांची संख्या वाढत असताना, वाहनतळाची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे रस्त्यावरच गाड्या उभ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका वाहतुकीला बसत असल्याने, वाहनतळांची संख्या वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. यावर उपाय म्हणून सेटबॅकसाठी सोडलेली जागा ताब्यात घेऊन, त्या ठिकाणी महापालिकेने वाहनतळ उभारण्याची ठरावाची सूचना महासभेत मांडण्यात आली आहे.
मुंबईत २४ लाखांहून अधिक वाहने आहेत. मात्र, पार्किंगची व्यवस्था अपुरी आहे. त्यामुळे बºयाच ठिकाणी रस्त्यावरच वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने पार्किंगचे सुधारित धोरण आणले, परंतु हे धोरण मार्गी लागेपर्यंत वाहनतळाची मागणी वाढतच आहे. ही समस्या सोडविण्यासाठी भूमिगत वाहनतळ उभारण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार, भायखळा येथील वाहनतळ झुला मैदानाखाली, तर वांद्रे पश्चिम येथील लिंक रोडवर नॅशनल कॉलेजजवळील रावसाहेब पटवर्धन उद्यानाखाली भूमिगत वाहनतळ बनविण्यात येणार आहे.
त्याचबरोबर, भविष्यात रस्ता रुंदीकरण आदी कामांसाठी तरतूद म्हणून इमारत प्रस्ताव खात्याकडून ठरविण्यात आलेली इमारतीच्या मागची जागा (सेटबॅक) सोडण्यात येते. ही जागा तेथील इमारतीच्या रहिवाशांनी पालिकेच्या ताब्यात देणे अपेक्षित असते. मात्र, विकासक किंवा इमारतीमधील रहिवाशी ही जागा पालिकेच्या ताब्यात देत नाहीत. त्याचा स्वत: वापर करतात. अशा जागा तत्काळ ताब्यात घेऊन त्या ठिकाणी वाहनतळ उभारण्यात यावा, अशी ठरावाची सूचना जावेद जुनेजा यांनी पालिकेच्या महासभेपुढे मांडली आहे. महासभेच्या मंजुरीनंतर यावर आयुक्तांचा अभिप्राय मागविण्यात येणार आहे.

५० हजार जागांची कमतरता
राज्यात वाहनांची संख्या ३.२ कोटी आहे, तर मुंबईतील वाहनांची संख्या ३० लाख ६९ हजार आहे.
दक्षिण मुंबईत १५ हजार, पश्चिम उपनगरात १५ हजार, उत्तर
विभागात दहा हजार आणि पूर्व उपनगरात दहा हजार असे एकूण ५० हजार पार्किंगच्या जागांची कमतरता आहे.

- दररोज दीड लाख वाहने मुंबईत येत असतात.
- मुंबईत १९९१ मध्ये वाहनांची संख्या सहा लाख २८ हजार होती.
- २०१३-१४ मध्ये एक लाख ८६ हजार ६४० वाहनांची नोंदणी झाली.
- २०१४-१५ मध्ये दोन लाख १४ हजार २५१ वाहनांची नोंदणी झाली.
- २०१५-१६ मध्ये दोन लाख ४० हजार ७४६ वाहनांची नोंदणी झाली.
- २०१६-१७ मध्ये अडीच लाख वाहनांची नोंदणी झाली.

Web Title: 'Setback' transcript on parking problem, no parking number incomplete, use of reserved space in building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई