Join us

आपत्कालीन घटनांसाठी पालिकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’, शहर आपत्ती प्रतिसाद पथकाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 7:03 AM

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार महाराष्ट्र शासनातर्फे ‘आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई आणि मुंबई उपनगरे’ स्थापन करण्यात आले. त्यानुसार, मुंबई महापालिकेतर्फे मुंबई शहरात पहिल्यांदाच ‘आपत्ती प्रतिसाद पथका’ची निर्मिती करण्यात आली आहे.

मुंबई : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार महाराष्ट्र शासनातर्फे ‘आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई आणि मुंबई उपनगरे’ स्थापन करण्यात आले. त्यानुसार, मुंबई महापालिकेतर्फे मुंबई शहरात पहिल्यांदाच ‘आपत्ती प्रतिसाद पथका’ची निर्मिती करण्यात आली आहे.शहर आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त आय. ए. कुंदन यांच्या हस्ते शहर आपत्ती प्रशिक्षण केंद्र, परळ येथे झाले. कुंदन याबाबत म्हणाल्या, शहर आपत्ती प्रतिसाद पथक आज देशात पहिल्यांदा मुंबईत साकारत असताना, प्रशासनाने मोठे पाऊल उचलेले आहे. या पथकातील प्रत्येक सदस्याने आपले दायित्व लक्षात घेऊन कर्तव्य पार पाडावे आणि देशातील एक सक्षम पथक म्हणून नावारूपाला यावे.एफ दक्षिण/एफ उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष सचिन पडवळ यांनी सांगितले, मुंबईत आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महापालिका सक्षम पद्धतीने काम करते. आपत्ती व्यवस्थापन पथक हे देशाला निश्चितच बोधपर ठरेल.२००५ ला मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व देशाला कळले असून, तेव्हापासून आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमात वेळोवेळी सुधारित नियम लागू करण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे २४ विभागीय कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आले आहे. यासोबतच विविध विभागाशी समन्वय साधून एकोप्याने काम केले जात आहे. शहर आपत्ती प्रतिसाद पथक हेही मुंबईला आपत्ती प्रसंगी महत्त्वाचे काम करेल.- किशोर क्षीरसागर, उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन.शहर आपत्ती प्रतिसाद पथकांविषयीराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ (कलम २५) अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगरे स्थापन करण्यात आले. या प्राधिकरणाचे अध्यक्ष महापालिका आयुक्त आहेत.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ३० (४) अन्वये राष्ट्रीय व राज्य प्राधिकरणाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे उद्भवू नये, म्हणून उपाययोजना, सज्जता आणि प्रतिसाद याकरिता ठोस पावले उचलणे या दृष्टीने हे पथक कार्य करते.या दृष्टीने शहर आपत्ती प्रतिसाद पथक तयार करण्याकरिता सुरक्षा दलातील २०० अधिकारी/जवान, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन अधिकारी व आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.च्प्रशिक्षणामध्ये ३० महिला व १७० पुरुष सुरक्षा रक्षकांचा समावेश.च्सर्व सुरक्षा रक्षक २५ ते ३० या वयोगटातील व पदवीधर असतील.च्एका महिन्यात एक तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल.प्रशिक्षणाचे स्वरूप असेच्रासायनिक, जैविक, अणुनैसर्गिक व आण्विक आपत्ती प्रशिक्षण.च्रासायनिक, जैविक, अणुनैसर्गिक व आण्विक आपत्ती हाताळण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येणारी यंत्रसामुग्री वापरण्याचे प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण.च्वैद्यकीय प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण, कोसळलेल्या बांधकामात अडकलेल्या लोकांचे विमोचन व बचाव नागरी विमोचन व बचाव नागरी विमोचन व बचाव पाठ्यक्रम.च्पुराच्या पाण्यातून बचाव करण्यासाठी विशेष प्रशिक्षण.च्सर्व प्रकारच्या नैसर्गिक तथा मानवनिर्मित्त आपत्तींस द्यावयाच्या प्रतिसाद स्तराचे प्रशिक्षण.

टॅग्स :मुंबई