महागड्या भेटवस्तूसाठी गमावले साडेसहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 03:04 AM2019-11-04T03:04:24+5:302019-11-04T03:04:32+5:30

गृहिणीची फसवणूक : कांदिवलीतील प्रकार

Seven and a half million lost for expensive gifts | महागड्या भेटवस्तूसाठी गमावले साडेसहा लाख

महागड्या भेटवस्तूसाठी गमावले साडेसहा लाख

Next

मुंबई : महागड्या भेटवस्तूसाठी गृहिणीवर साडेसहा लाख गमाविण्याची वेळ आली. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवलीच्या शिवाजी रोड परिसरात २९ वर्षीय तक्रारदार कुटुंबीयासोबत राहतात. त्यांची शॉन डिसिल्वा, कविता आणि नेहासोबत ओळख झाली. ओळखीतून त्यांनी विवाहितेला ६२ लाखांच्या भेटवस्तूचे आमिष दाखविले.

महिलेनेदेखील भेटवस्तूसाठी स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली. पुढे भेटवस्तूंसाठी त्यांना विविध करांच्या नावाखाली ६ लाख ४८ हजार उकळले. पुढे आणखीन पैशांची मागणी करण्यात आली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने बुधवारी कांदिवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तिघांच्याही फोन कॉल्सनुसार, पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. तिघांचीही पूर्ण नावेदेखील महिलेला माहिती नाही. महागड्या गिफ्टच्या नादात त्यांना लाखोंचा फटका बसला आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनाही धक्का बसला आहे. कांदिवली पोलीस तांत्रिक पुराव्याच्या आधारे अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: Seven and a half million lost for expensive gifts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.