- दीपक भातुसे
मुंबई : हिंदूविरोधी आशय असल्याची तक्रार आल्याने सांस्कृतिक कार्य संचालनालयाने रोखलेला ६१व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा चंद्रपूर केंद्राचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. हा निकाल रोखल्याबाबतचे वृत्त गुरुवारी “लोकमत'ने प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रकाशित होताच सव्वा महिन्यापासून रोखलेला हा निकाल संचालनालयाने वृत्त प्रकाशित झाले त्याच रात्री म्हणजे गुरुवारी रात्रीच उशिरा जाहीर केला.
ज्या 'वृंदावन' नाटकाला आक्षेप घेण्यात आला होता, त्या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून, प्रथम पुरस्कारासह एकूण सात पुरस्कार या नाटकाला मिळाले आहेत. नाट्य स्पर्धेतील 'वृंदावन' आणि 'तेरे मेरे सपने' या दोन नाटकात हिंदूविरोधी आशय असल्याचा आक्षेप घेत अभाविप तक्रार केली होती.
'वृंदावन' प्रथम पुरस्कारासह अंतिम फेरीत'लोकमत'च्या वृत्तानंतर हा निकाल जाहीर झाला तेव्हा आक्षेप घेतलेल्या मराठी बाणा संस्थे'च्या 'वृंदावन' या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याचे समोट आले असून, या नाटकालाच निर्मिती, दिग्दर्शन, प्रकाश योजना, रंगभूषा आणि अभिनयासाठी तीन पुरस्कार, असे एकूण सात पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय चिखलगावच्या 'अंजना उत्तम संस्थेच्या ए... आपण चहा घ्यायच' या नाटकास द्वितीय आणि यवतमाळच्या 'अस्मिता रंगायतन संस्थेच्या 'किनारा' नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
'बाद' करण्याची मागणीही नाटके स्पर्धेतून बाद करण्याची मागणी होती. त्यामुळे संचालनालयाने जाहीर केला नव्हता. नाट्य स्पर्धेचा निकाल अशा पद्धतीने रोखल्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.