मुंबईत स्वाइन फ्लूचे सात रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 06:39 AM2019-02-21T06:39:44+5:302019-02-21T06:42:09+5:30

फेब्रुवारीतील आकडेवारी : पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली माहिती

Seven cases of swine flu in Mumbai | मुंबईत स्वाइन फ्लूचे सात रुग्ण

मुंबईत स्वाइन फ्लूचे सात रुग्ण

googlenewsNext

मुंबई : देशातील अन्य राज्यांत स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. राज्यातही आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे १७ जणांचा बळी गेला आहे, तर फेब्रुवारीच्या पंधरवड्यात मुंबई शहर-उपनगरात स्वाइन फ्लूचे सात रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यातील १५ दिवसांत स्वाइन फ्लूचे ७ रुग्ण आढळले. त्यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व वॉर्डातील संबंधित अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय ताप आणि सर्दी अधिक काळ अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे. जानेवारी ते आतापर्यंत या काळात राज्यात सुमारे तीन लाख ५० हजार रुग्ण तपासण्यात आले आहे. स्वाइन फ्लूला आळा घालण्यासाठी सर्वंकष कृती योजना अंमलात आणण्याचे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागासह महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाºयांना दिले आहेत. यात स्वाइन फ्लूसंदर्भात प्रबोधनात्मक संदेश तयार करावेत. स्वाइन फ्लू कसा पसरतो, त्याची लक्षणे, हा आजार होऊ नये, म्हणून घ्यावयाची काळजी, आजार पसरू नये, म्हणून घ्यावयाची काळजी, या आजारावरील उपचाराबाबत माहिती या संदर्भात सामान्यांना माहिती द्यावी. सर्व माध्यमिक शाळांमध्ये जनजागृती करण्यासाठी नर्सेस, आरोग्यसेवक यांची मदत घेऊन मार्गदर्शन करावे आदी सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

राज्यात सुमारे साडेतीन लाख रुग्णांची तपासणी

जानेवारी ते आतापर्यंत या काळात राज्यात सुमारे तीन लाख ५० हजार रुग्ण तपासण्यात आले आहे. त्यापैकी चार हजार रुग्णांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. च्दरम्यान, स्वाइन फ्लूला आळा घालण्यासाठी सर्वंकष कृती योजना अंमलात आणण्याचे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागासह महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाºयांना दिले आहेत.
च्स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 

Web Title: Seven cases of swine flu in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.