बकरी ईदसाठी भिवंडीत सात चेकपोस्ट
By admin | Published: September 14, 2015 03:14 AM2015-09-14T03:14:41+5:302015-09-14T03:14:41+5:30
बकरी ईदसाठी भिवंडी शहरात विविध राज्यांतून जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होण्याची शक्यता असल्याने त्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी
काल्हेर : बकरी ईदसाठी भिवंडी शहरात विविध राज्यांतून जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होण्याची शक्यता असल्याने त्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी भिवंडी शहराला जोडणाऱ्या मुख्य मार्गांवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.
बकरी ईदनिमित्त शहरात मोठ्या संख्येने जनावरांच्या कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असते. त्यामुळे अशा वाहतुकीवर आळा घालण्यासाठी शहराला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणकोली नाका व छोटा जकात नाका, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबा जकात नाका, निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रफिकनगर-तळवली नाका, भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारिवली नाका, टाऊन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील के. बी. चौकी, कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवे टोलनाका व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबवली नाका अशा ७ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पोलीस संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करीत असून आतापर्यंत बऱ्याच जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
या बकरी ईदमध्ये चोरटे परिसरातील ग्रामीण भागातील जनावरांची चोरी करीत असतात. त्यामुळे सतर्क राहण्याचे आदेश संबंधित पोलिसांनी ग्रामस्थांना दिले आहेत. हे चोरटे जनावरे वाहतुकीसाठी बोलेरो व इतर जीपचा वापर करीत
असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. (वार्ताहर)