सात कोटींची फसवणूक
By admin | Published: May 6, 2017 03:58 AM2017-05-06T03:58:00+5:302017-05-06T03:58:00+5:30
सदनिका विकण्याच्या बहाण्याने मालाडच्या ५७ वर्षीय महिला डॉक्टरसह, अन्य काही सभासदांना साडेचार वर्षांत ७ कोटींचा
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सदनिका विकण्याच्या बहाण्याने मालाडच्या ५७ वर्षीय महिला डॉक्टरसह, अन्य काही सभासदांना साडेचार वर्षांत ७ कोटींचा चुना लावल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी ७ आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मालाड पश्चिमेत डॉक्टर अल्बन आल्फेड पैस (५७) कुटुंबासह राहतात. आॅक्टोबर २०१२ मध्ये आरोपींच्या टोळीने त्यांच्यासह येथील अन्य सभासदांची घर विक्रीच्या नावे फसवणूक केली. (प्रतिनिधी)