Join us

सात ठिकाणे काळ्या यादीत गेल्याची अफवा; आयुक्तांच्या नावाने तिसरी ध्वनिफीत प्रसारित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 1:11 AM

मोहम्मद सोहेल महोम्मद सलीम पंजाबी(३२) असे अटक आरोपीचे नाव आहे.

मुंबई : मोहम्मद अली रोडसह मुंबईतील ७ ठिकाणे पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने त्यांचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही ठिकाणे लष्कराच्या ताब्यात देत, लष्कराला रबरी गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी अफवा पसरवून नागरिकांमध्ये भिती निर्माण करणाऱ्या तरुणाला जेजे मार्ग पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. मोहम्मद सोहेल महोम्मद सलीम पंजाबी(३२) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रेड अलर्ट म्हणत दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोड, डोंगरी, भेंडी बाजार, मदनपुरा, काला पाणी, सात रस्ता सह ७ भागातील रहिवासी कोरोनाबाबतचे प्रतिबंधात्मक उपाय पाळत नाहीत, शासनाला सहकार्य करत नाहीत, येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यामुळे या भागांची जबाबदारी लष्कराकड़े देण्यात आली आहे.लॉकडाउन किंवा जमावबंदीसह अन्य निबंर्धांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट रबरी गोळी झाडण्याचे आदेश देण्यात आले असल्याचा मजकूर व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकच्या माध्यमातून व्हायरल झाला. या मजकुरामुळे दक्षिण मुंबईत भितीचे वातावरण होते. या सोबतच लष्करी जवानांच्या संचलनाची ध्वनिचित्रफीतही जोडल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करत, आरोपीचा शोध सुरु केला. तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलीस सोहेलपर्यन्त पोहचले. त्यानेच ही अफवा पसरविल्याचे स्पष्ट होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी कारवाई केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अधिकृत टिष्ट्वटवर विश्वास ठेवण्याचे आवाहन

मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या नावाने तिसरी खोटी ध्वनिफित व्हायरल झाली आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी टिष्ट्वटद्वारे सांगितले. शिवाय मुंबई पोलीस किंवा पोलीस आयुक्तांच्या अधिकृत टिष्ट्वटरवरून प्रसारित करण्यात येणाºया ध्वनिफित अथवा माहितीवर विश्वास ठेवा असेही पोलिसांकड़ून सांगण्यात आले. या बनावट ध्वनिफित बाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :पोलिसमुंबई