करचुकव्या सात मालमत्ता सील, पालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 04:57 AM2018-03-11T04:57:10+5:302018-03-11T04:57:10+5:30

जकात कर रद्द झाल्यानंतर महापालिकेसाठी मालमत्ता कर हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनले आहे. मात्र, बड्या व्यावसायिक आणि निवासी थकबाकीदारांनी गेल्या काही वर्षांमध्ये महापालिकेचे तब्बल नऊ हजार ९४७ कोटी रुपये थकविले आहेत. त्यानुसार, उच्चभ्रू वस्ती, तसेच सात मोठ्या कंपन्यांना सील करत, महापालिकेने २८ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे.

 Seven properties sealed, cash withdrawal | करचुकव्या सात मालमत्ता सील, पालिकेची कारवाई

करचुकव्या सात मालमत्ता सील, पालिकेची कारवाई

Next

मुंबई - जकात कर रद्द झाल्यानंतर महापालिकेसाठी मालमत्ता कर हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनले आहे. मात्र, बड्या व्यावसायिक आणि निवासी थकबाकीदारांनी गेल्या काही वर्षांमध्ये महापालिकेचे तब्बल नऊ हजार ९४७ कोटी रुपये थकविले आहेत. त्यानुसार, उच्चभ्रू वस्ती, तसेच सात मोठ्या कंपन्यांना सील करत, महापालिकेने २८ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे.
जकात कर रद्द झाल्यामुळे महापालिकेचे मदार आता मालमत्ता करावर आहे. त्यानुसार, सन २०१७-२०१८ मध्ये मालमत्ता करातून पाच हजार ४०२.४९ कोटी उत्पन्न मिळण्याचे लक्ष्य होते. मात्र, ६ मार्च २०१८ पर्यंत पालिकेच्या कर निर्धारक आणि संकलन विभागाने तीन हजार ८२० कोटी रुपये वसूल केले आहेत, तर सुमारे एक हजार ६०० कोटी रुपये अद्याप थकीत आहेत.
मालमत्ता कराच्या १०० मोठ्या थकबाकीदारांनी २०१० पासून तब्बल ६०१ कोटी रुपये थकविले आहेत. थकबाकीदारांमुळे यंदाचे लक्ष्य हुकणार नाही, याची काळजी घेत, महापालिकेने १०० थकबाकीदारांची यादी तयार करत कारवाई सुरू केली आहे. या थकबाकीदारांवर महापालिकेने धाड टाकण्यास सुरुवात केली आहे.
प्रामुख्याने सात मोठ्या मालमत्तांवर ‘सील’ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्गावरील (नेपियन्सी मार्ग) ‘आशियाना’ इमारत, गोरेगाव परिसरातील रिलायबल बिल्डर्सचा मोकळा भूखंड, सनशाइन हाउसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर यांचा आरे रोड येथील मोकळा भूखंड, ‘एल’ विभागामधील ‘एचडीआयएल’ कंपनीची मालमत्ता, ग्रॅन्ट रोडजवळील ‘नाज सिनेमा’, देवनार इंडस्ट्रियल सोसायटीचा आणि खार परिसरातील ‘टष्ट्वीलाइट’ सोसायटीच्या मोकळ्या भूखंडांचा समावेश असल्याची माहिती सहायक आयुक्त
देवीदास क्षीरसागर यांनी दिली
आहे.

या थकबाकीदारांवर कारवाई...
-लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्गावरील ‘आशियाना’ इमारत (नेपियन्सी मार्ग) - सात कोटी ९९ लाख ६१ हजार ८२ रुपये थकबाकी.
- इमारतीच्या ‘कार लिफ्ट’चा दरवाजा सील करण्यात आला आहे.

-ग्रॅन्ट रोड स्टेशनजवळील ‘नाज सिनेमा’च्या (मे. माजदा थिएटर्स) भूखंडावर चार कोटी १३ लाख १३ हजार ७६१ एवढी थकबाकी आहे. या भूखंडाचा मुख्य दरवाजा सील करण्यात आला.
-‘पी दक्षिण’ विभागातील लक्ष्मीनगर, गोरेगाव परिसरातील रिलायबल बिल्डर्सच्या मोकळ्या भूखंडावर चार कोटी ६० लाख ९२ हजार २० रुपये एवढी थकबाकी आहे. ही थकबाकी न भरल्यामुळे या भूखंडाचा काही भाग ६ मार्च रोजी सील केला आहे.
- आरे रोड परिसरातील ‘सनशाइन हाउसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ यांच्यावर चार कोटी ०८ लाख १५ हजार १३८ रुपये एवढी थकबाकी आहे. या भूखंडावर प्रवेश करण्यासाठी असणारा मुख्य दरवाजा सील करण्यात आला आहे.
- ‘एल’ विभाग परिसरातील ‘मे. एचडीआयएल’ यांच्या अखत्यारितील मोकळ्या भूखंडावर मालमत्ता कराची चार कोटी ४१ लाख ८३ हजार ४९९ एवढी थकबाकी आहे. ही थकबाकी जमा न झाल्याने, भूखंडावरील ‘साइट आॅफिस’ सील करण्यात आले आहे.
- ‘एम पूर्व’ विभागातील देवनार इंडस्ट्रियल प्रिमायसेस सहकारी सोसायटी लि. यांच्या अखत्यारितील मोकळ्या भूखंडावर दोन कोटी १८ लाख ३३ हजार २६४ एवढ्या रकमेची मालमत्ता कर थकबाकी आहे. या थकबाकीपोटी या भूखंडावर जाण्याचे मुख्य प्रवेशद्वार सील करण्यात आले आहे.
- ‘एच पश्चिम’ विभाग क्षेत्रातील खार परिसरातील १५व्या रस्त्यावर असणाºया टष्ट्वीलाइट सोसायटीच्या मोकळ्या भूखंडावर
९० लाख ७१ हजार ७३ रुपये एवढी मालमत्ता कराची थकबाकी असून, या भूखंडाचा मुख्य प्रवेश दरवाजा सील करण्यात आला आहे.

अशी होते कारवाई
मालमत्ता कराची देयके प्राप्त झाल्यापासून, ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या मुदतीत मालमत्ता कर न भरणाºया करदात्यांवर टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते.
सर्वप्रथम महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क व संवाद साधून देयक भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही देयक अदा न केल्यास, ‘डिमांड लेटर’ पाठविले जाते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात २१ दिवसांची अंतिम नोटीस मालमत्ता धारकास दिली जाते.
त्यानंतरच्या टप्प्यात मालमत्ता किंवा मालमत्तेचा काही भाग ‘सील’ (मोहोरबंद) करण्याची कारवाई होते. त्यानंतर, मालमत्ता व्यवसायिक स्वरूपाची असल्यास जलजोडणी खंडित करण्याची कारवाईदेखील केली जाते.
शेवटच्या टप्प्यामध्ये मालमत्ता जप्तीची
कारवाई केली जाते.

(आकडेवारी कोटींमध्ये)
वर्ष लक्ष्य वसूल थकबाकी
(५ मार्चपर्यंत)
२०१७-१८ ५,४०२.४९ ३,७८६.८५ १,६१५.६४

गेल्या काही वर्षातील थकबाकी - ९,९४७
न्यायालयात प्रकरणे प्रलंबित- ५,०९३
वाद नसलेले - ४,८५४ (आकडेवारी कोटींमध्ये)

Web Title:  Seven properties sealed, cash withdrawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.