टीवायबीकॉमसह सात निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 06:12 AM2018-09-19T06:12:18+5:302018-09-19T06:12:38+5:30

Seven results, including TYBCom, are announced | टीवायबीकॉमसह सात निकाल जाहीर

टीवायबीकॉमसह सात निकाल जाहीर

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाने बीकॉमच्या तृतीय वर्षाचा आयडॉल व महाविद्यालयातील वार्षिक परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला आहे. या निकालाबरोबरच विद्यापीठाने इतर ७ परीक्षांचे निकालही जाहीर केले आहेत.
आयडॉलसह महाविद्यालयातील टीवायबीकॉमच्या परीक्षेस ६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ९१५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात ३ हजार ०६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या उत्तीर्णतेची टक्केवारी ५८.३१ टक्के इतकी आहे. तपासलेल्या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व मॉडरेशन आॅनस्क्रीन मार्किंग (ओएसएम) पद्धतीने झाले आहे. विद्यापीठाने या दोन दिवसांत विविध पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे एकूण ७ निकाल जाहीर केले आहेत. त्यात एमए-एन्टरटेन्मेंट मीडिया सत्र ४, एमए इंग्लिश सत्र ४, एमए इंग्लिश - रिसर्च सत्र ४, एमएफएम तृतीय वर्ष सत्र २, एमआयएम तृतीय वर्ष सत्र २, एमए भाग १ व एमए भाग २ हे सात निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
पदव्युत्तर एमए व एमएस्सी सत्र परीक्षेचे सर्व निकाल जाहीर केले असून, उन्हाळी सत्राच्या निकालाचे काम जवळपास पूर्ण झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी दिली. एमकॉम (आयडॉल) भाग १ व २ या दोन्ही परीक्षेचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, ते दोन्हीही निकाल दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

उर्वरित दोन दिवसांत
मुंबई विद्यापीठाने या दोन दिवसांत विविध पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे एकूण ७ निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून उर्वरित निकाल दोन दिवसांत जाहीर होतील.

Web Title: Seven results, including TYBCom, are announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.