Join us

मुंबईत अवतरणार जगातील सात आश्चर्ये, महापालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 7:18 AM

जगातील सात आश्चर्यांविषयी कोणाला आकर्षण नाही? पण ही सात आश्यर्चे प्रत्यक्षात बघणे सर्वसामान्यांसाठी दुर्लभच. मुंबईकरांना मात्र लवकरच या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती पाहता येणार आहेत.

मुंबई : जगातील सात आश्चर्यांविषयी कोणाला आकर्षण नाही? पण ही सात आश्यर्चे प्रत्यक्षात बघणे सर्वसामान्यांसाठी दुर्लभच. मुंबईकरांना मात्र लवकरच या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती पाहता येणार आहेत. दक्षिण मुंबईतील भंडारवाडा टेकडीवरील ‘जोसेफ बाप्टिस्टा उद्याना’मध्ये जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती महापालिका उभारणार आहे.डॉकयार्ड रेल्वे स्टेशननजीक असलेल्या महापालिकेच्या या उद्यानातून दक्षिण मुंबईचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. समुद्रसपाटीपासून सुमारे शंभर फुटांपेक्षा अधिक उंच असणाºया टेकडीच्या माथ्यावर पाच लाख ४४ हजार चौरस फुटांच्या परिसरात हे उद्यान पसरले आहे. मुंबईतील सर्वांत जुन्या उद्यानांपैकी एक असणाºया या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रजातींची फळझाडे, फुलझाडे, वेली आहेत.या उद्यानातीन छोटा कृत्रिम धबधबा आत्तापर्यंत पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. मात्र यापुढे येथे उभ्या राहिलेल्या सात आश्चर्यांच्या प्रतिकृतीही पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरणार आहेत. यासाठी पालिकेला दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मे २०१८पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज पालिकेच्या उद्यान कक्षाच्या कार्यकारी अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.मुंबई : जगातील सात आश्चर्यांविषयी कोणाला आकर्षण नाही? पण ही सात आश्यर्चे प्रत्यक्षात बघणे सर्वसामान्यांसाठी दुर्लभच. मुंबईकरांना मात्र लवकरच या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती पाहता येणार आहेत. दक्षिण मुंबईतील भंडारवाडा टेकडीवरील ‘जोसेफ बाप्टिस्टा उद्याना’मध्ये जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती महापालिका उभारणार आहे.डॉकयार्ड रेल्वे स्टेशननजीक असलेल्या महापालिकेच्या या उद्यानातून दक्षिण मुंबईचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. समुद्रसपाटीपासून सुमारे शंभर फुटांपेक्षा अधिक उंच असणाºया टेकडीच्या माथ्यावर पाच लाख ४४ हजार चौरस फुटांच्या परिसरात हे उद्यान पसरले आहे. मुंबईतील सर्वांत जुन्या उद्यानांपैकी एक असणाºया या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रजातींची फळझाडे, फुलझाडे, वेली आहेत.या उद्यानातीन छोटा कृत्रिम धबधबा आत्तापर्यंत पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. मात्र यापुढे येथे उभ्या राहिलेल्या सात आश्चर्यांच्या प्रतिकृतीही पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरणार आहेत. यासाठी पालिकेला दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मे २०१८पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज पालिकेच्या उद्यान कक्षाच्या कार्यकारी अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.सध्याचीहवेची स्थितीच्ब्राझिलमधील रिओ शहरातील येशू ख्रिस्तांचा पुतळाच्इटलीमधील पिसा शहरातील कलता मनोराच्अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरातील स्वातंत्र्यदेवतेचापुतळाच्कमानकला व स्थापत्य अभियांत्रिकीचे एक श्रेष्ठ उदाहरण मानल्या जाणाºया इटलीतील रोम शहरातील कलोसियम हे खुले सभागृहच्फ्रान्समधील पॅरिस शहरातील आयफेल टॉवरच्पुरातन संस्कृतीशी नाते सांगणारा मेक्सिको देशातल्या टिनम शहरातील चिनचेन इत्झा पिरॅमिडच्भारतातील आग्रा शहरातील ताजमहालप्रतिकृतींतून होणारसत्याचा भाससात आश्चर्यांच्या प्रत्येक प्रतिकृतीजवळ संबंधित मूळ ठिकाणाची माहिती व वैशिष्ट्ये सांगणारे फलक बसविण्यात येणार आहेत. तसेच प्रतिकृतींच्यासभोवताली रंग बदलणारे एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. या दिव्यांमुळे संध्याकाळी व रात्री या प्रतिकृतींचे सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे.

टॅग्स :मुंबई