जोसेफ बाप्टिस्टा उद्यानात अवतरणार जगातील सात आश्चर्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:41 AM2018-05-16T02:41:57+5:302018-05-16T02:41:57+5:30

दक्षिण मुंबईतील भंडारवाडा टेकडीवरील जोसेफ बाप्टिस्टा उद्यानामध्ये जगातील सात आश्चर्यांची प्रतिकृती महापालिकेमार्फत उभारण्यात येणार आहे.

Seven Wonders of the World to Fall in Joseph Baptista Garden | जोसेफ बाप्टिस्टा उद्यानात अवतरणार जगातील सात आश्चर्ये

जोसेफ बाप्टिस्टा उद्यानात अवतरणार जगातील सात आश्चर्ये

Next

मुंबई : दक्षिण मुंबईतील भंडारवाडा टेकडीवरील जोसेफ बाप्टिस्टा उद्यानामध्ये जगातील सात आश्चर्यांची प्रतिकृती महापालिकेमार्फत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पैशांअभावी ‘याची देही याची डोळा’ पाहू न शकणाऱ्या सर्वसामान्यांना ही सात आश्चर्ये मुंबईतच पाहता येणार आहेत. या प्रतिकृती उभारण्याचे काम मे महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असताना मंगळवारपासून (दि. १५) या कामाला सुरुवात झाली आहे.
डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या महापालिकेच्या या उद्यानातून दक्षिण मुंबईचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून येतात. समुद्रसपाटीपासून सुमारे १०० फुटांपेक्षा उंच असणाºया टेकडीच्या माथ्यावर पाच लाख ४४ हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात हे उद्यान पसरलेले आहे. मुंबईतील सर्वांत जुन्या उद्यानांपैकी एक असणाºया या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रजातींची फळझाडे, फुलझाडे, वेली आहेत. या उद्यानातील छोटा कृत्रिम धबधबा आतापर्यंत पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरत होता. माजी नगरसेविका यामिनी जाधव यांनी या उद्यानाची संकल्पना मांडली होती. जगातील या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरतील याची पालिकेला खात्री आहे. यासाठी दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
>कामाला विलंब : या उद्यानाचे नूतनीकरण आणि जगातील सात आश्चर्यांची प्रतिकृती उभारण्याचे काम मे २०१८मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप या कामाला सुरुवातही झालेली नाही. मंगळवारी या उद्यानात भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. या प्रतिकृतींसोबतच आवश्यक असणारे फॅब्रिकेशनचे काम व पाया बांधणे, स्टेनलेस स्टीलचे कुंपण बसविणे, सूचनाफलक बसविणे, शिल्पाकृतींच्या सभोवताली रंगीत दिवाबत्ती, रोशणाई व उद्यानविषयक हिरवळ, सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
>प्रतिकृतीतून होणार सत्याचा भास
सात आश्यर्चांच्या प्रत्येक प्रतिकृतीजवळ संबंधित मूळ ठिकाणाची माहिती व वैशिष्ट्ये सांगणारे फलक बसविण्यात येणार आहेत. तसेच प्रतिकृतींच्या सभोवताली रंग बदलणारे एल.ई.डी. दिवे बसविण्यात
येणार आहेत. या दिव्यांमुळे सायंकाळी व रात्री या प्रतिकृतींचे सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे.
>ही आहेत सात आश्चर्ये
१ ब्राझिलमधील रिओ शहरातील येशू ख्रिस्ताचा पुतळा
२ इटलीमधील पिसा शहरातील कलता मनोरा
३ अमरिकेतील न्यू यॉर्क शहरातील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा
४ कमानकला व स्थापत्य अभियांत्रिकीचे एक श्रेष्ठ उदाहरण मानल्या जाणाºया इटलीतील रोम शहरातील कलोसियम हे खुले सभागृह
५ फ्रान्समधील पॅरिस शहरातील आयफेल टॉवर
६ मेक्सिको देशातल्या टिनम शहरातील चिनचेन इत्झा पिरॅमिड,
७ भारतातील आग्रा शहरातील ताजमहाल

Web Title: Seven Wonders of the World to Fall in Joseph Baptista Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.