आरोपीस सात वष्रे सक्तमजुरी

By admin | Published: June 28, 2014 11:36 PM2014-06-28T23:36:49+5:302014-06-28T23:36:49+5:30

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा:या आरोपीला ठाणो न्यायालयाने सात वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.

Seven years in prison for the accused | आरोपीस सात वष्रे सक्तमजुरी

आरोपीस सात वष्रे सक्तमजुरी

Next
>ठाणो : माथाडी कामगाराच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणा:या आरोपीला ठाणो न्यायालयाने सात वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.  
नवनाथ रामचंद्र गायकवाड (25) असे या आरोपीचे नाव आहे. पीडित 11वर्षीय मुलगी कोपरखैरणो परिसरात आई, वडील आणि भावासह राहते. याच परिसरात राहणा:या त्यांच्या नातेवाइकाकडे आरोपी जेवणाकरिता येत होता. त्यामुळे आरोपी आणि पीडित मुलीचे कुटुंबीय यांच्यात ओळख होती. याचाच फायदा घेत 18 जानेवारी 2क्क्8 रोजी आरोपीने मुलीला सायकल शिकविण्याच्या बहाण्याने कोपरी ब्रीज येथे नेले आणि  तिच्याबरोबर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. 
याला मुलीने विरोध करताच नवनाथने तिचे डोके दगडावर आपटले व तिला भिंतीवर ढकलून गंभीर जखमी केले आणि पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत रडत असलेल्या मुलीला पाहणा:यांनी तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर  आरोपीला अटक केली. या खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारी ठाणो सत्र न्यायालयात झाली. न्या. ए.एस. वाघवसे यांनी आरोपीला  363 कलमाखाली 5 वर्षाची शिक्षा आणि हजार रुपये दंड, 354 कलमाखाली 2 वर्षाची शिक्षा आणि हजार रु. दंड, 3क्7 कलमाखाली 7 वर्षाची शिक्षा आणि हजार रु. दंड ठोठावला. (प्रतिनिधी)
 
च्आरोपी आणि पीडित मुलीचे कुटुंबीय यांची ओळख होती. याचाच फायदा घेत 18 जानेवारी 2क्क्8 रोजी आरोपीने मुलीला सायकल शिकविण्याच्या बहाण्याने कोपरी ब्रीज येथे नेले आणि  बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. 
च्दंड न भरल्यास 3 महिन्यांची अतिरिक्त कैद सुनावली आहे. एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील म्हणून भुलेश्वर हिंगे यांनी काम पाहिले. 

Web Title: Seven years in prison for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.