Join us

सेव्हनहिल्स रुग्णालयात कर्मचारी , डॉक्टरांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 7:07 PM

मुंबईतील कोविड रुग्णांसाठी १००० हुन अधिक बेड्सची सुविधा असणाऱ्या अंधेरीच्या सेव्हनहिल्स रुग्णालयात कर्मचाऱ्यांची , डॉक्टरांची आणि तज्ज्ञांची मात्र वानवा जाणवत असल्याची परिस्थिती समोर आली आहे.

मुंबई : मुंबईतील कोविड रुग्णांसाठी १००० हुन अधिक बेड्सची सुविधा असणाऱ्या अंधेरीच्या सेव्हनहिल्स रुग्णालयात कर्मचाऱ्यांची , डॉक्टरांची आणि तज्ज्ञांची मात्र वानवा जाणवत असल्याची परिस्थिती समोर आली आहे. यासाठी रुग्णालयाकडून वरिष्ठ वैद्यकीय सल्लागारपदासाठी इंटेस्टिव्हिस्ट (एमडी मेडिसिन), अ‍ॅनेस्थेटिस्ट (एमडी), नेफ्रोलॉजिस्ट (डीएम), कार्डिओलोजिस्ट (एमडी), न्यूरोलॉजिस्ट (डीएम), तसेच साहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदासाठी एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस झालेल्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून तयासाठी अधिकृत जाहिरातदेखील काढली आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी रुग्णालयाकडून ५०  २लाखांपर्यंतचे वेतन, महिन्यातील १५ दिवस कोरोना रुग्णांना सेवा दिल्यानंतर क्वारंटाईन पिरियड अशा सुविधाही दिल्या जाणार आहेत.

रदेशवारी करून परतलेल्या करोना संशयितांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर करोनाबाधितांसाठी याच रुग्णालयात विलगीकरण कक्षाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली.  मात्र सुरुवातीपासूनच रुग्णालयात कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, तज्ज्ञ यांची कमतरता दिसून आली. सध्या रुग्णालयात १७६ डॉक्टर्स उपलब्ध असून अद्याप ६०० डॉक्टरांची आवश्यकता असल्याची माहिती मिळत आहे.  महापालिकेने हे रुग्णालय ताब्यात घेतल्यानंतर इथे अनेक कर्मचारी आणि डॉक्टरांची आवश्यकता असल्याने याच कारणास्तव ही जाहिरात देशपातळीवर काढण्यात आली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस