सातपाटी सागरी पोलीस स्टेशन परावलंबीच!
By admin | Published: November 25, 2014 11:05 PM2014-11-25T23:05:50+5:302014-11-25T23:05:50+5:30
केंद्राच्या हद्दीजवळच्या सागरी सुरक्षेसाठी सातपाटी सागरी पोलीस स्टेशनला आजही सुरक्षा साधनासाठी दुस:या पोलीस स्टेशनवर अवलंबून राहावे लागत आहे.
Next
हितेन नाईक - पालघर
तारापूर अणुशक्ती केंद्रासारख्या अत्यंत महत्वपूर्ण संवेदनशील केंद्राच्या हद्दीजवळच्या सागरी सुरक्षेसाठी सातपाटी सागरी पोलीस स्टेशनला आजही सुरक्षा साधनासाठी दुस:या पोलीस स्टेशनवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेबाबत आपण काय धडा घेतला? हा प्रश्न कायम आहे.
26/11 ला अतिरेक्यांनी मुंबईवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर शासनाने सागरी किना:यावर विशेष लक्ष पुरवित राज्यातील ठाणो ग्रामीण, रायगड, र}ागिरी, सिंधुदूर्ग, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यातील सातपाटी, केळवा, अर्नाळा, घोलवड, डहाणू इ. ठिकाणी सागरी पोलीस स्टेशनची उभारणी सन 2क्क्7 पासून करण्यात आली. स्पीडबोट, अत्याधुनिक बंदुका, रायफल्स, सर्चलाईटस, सारंग, इंजिनचालक, खलाशी इ. च्या नियंत्रणासाठी एका अधिका:यासह आठ पोलीस उपनिरिक्षक इ. सह मोठा कर्मचारीवर्ग मंजूर करण्यात आला हेाता. सातपाटी सागरी पोलीस स्टेशनची उभारणी करून आता 7 वष्रे उलटून गेली मात्र समुद्रातील संशयास्पद हालचाली व मच्छीमारांमधील तंटे सोडविण्यासाठी समुद्रात जायचे म्हटल्यास त्यांना अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनची शपथ स्पीडबोट अथवा डहाणू पो. स्टे. च्या तुकाराम आणि जीवदानी या स्पीड बोटीवर अवलंबून राहावे लागत आहे.
दि. 21 फ्रेब्रुवारी 2क्क्9 रोजी सातपाटीच्या समोर समुद्रात आलेल्या दोन संशयास्पद स्पीडबोटीचा शोध घेण्यात सातपाटी पो. स्टे. जवळ स्पीडबोट नसल्याने अपयश आले होते. डहाणू पो. स्टे. वरून स्पीडबोट येईर्पयत या दोन्ही बोटी नाहीशा झाल्या होत्या. सातपाटी सागरी पो. स्टे. मधील स्टाफ पैकी 5क् अधिकारी, कर्मचा:यांचा स्टाफ असला तरी त्याना सागरी सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा मंत्री, व्हिआयपी,
मोर्चे, आंदोलने यांच्या बंदोबस्तासाठीच स्टाफ पाठवावा लागतो आहे.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर इतक्या वर्षाचा कालावधी लोटूनही असे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा समर्थ झाली आहे का? याचे उत्तर सध्या तरी नाही असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटत असले तरी सोयीसुविधेच्या अभावामुळे असे हल्ले टाळण्यासाठी लागणारे आश्वासक वातावरणही सध्या दिसून येत नाही. सध्या सागरी पो. स्टे. ला समुद्री मार्गाने दारूगोळा घेऊन काही अतिरेकी येण्यासंदर्भात इशारा गुप्तचर यंत्रणोने दिल्याने मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अशावेळी काही अघटीत घडल्यास अद्ययावत अतिरेक्यांशी आमचे पोलीसदल दुय्यम प्रतिच्या व अपु:या साधन सामुग्रीशी सामना क सा करेल याबाबतही साशंकता व्यक्त केली जात असून अजून किती हेमंत करकरे, ओळंबे, अशोक कामटे इ. सारख्या शूर अधिका:यांचे बळी शासन देणार आहे असा प्रश्न लोकामधून विचारला जात आहे.
स्पीडबोटीची कमतरता जाणवतेय त्याची मागणी केली आहे. सध्यातरी स्थानिक मच्छीमारांचे सहकार्य उत्तम प्रकारे मिळतेय.
- भुजंग हातमोडे,
सहा. पो. नि., सातपाटी पो. स्टे.
यासंदर्भात सहा. पो. नि. बाथरे यांना केळवा पो. स्टे. संदर्भातील माहिती विचारली असता पत्रकारांना माहिती देणो बंधनकारक आहे का? याची माहिती वरीष्ठांकडून घेतो व तसे कळवतो असे सांगितले.