मुंबई - वडाळ्यातील मुंबई पोर्ट ट्रस्ट अधिकारी वसाहत अर्थात रेनॉल्ड्स वसाहतीत सतराव्या शतकातील दोन तोफा धूळ खात पडल्या आहेत. विशेष म्हणजे, मुंबईतील काही किल्ले आणि पुरातत्त्व खात्याकडे संवर्धनास ठेवलेल्या तोफांच्या मानाने या दोन्ही तोफा मोठ्या आहेत. तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक परशुराम कार्यकर्ते यांनी या तोफा निदर्शनास आणून दिल्या. त्यांच्या कर्मचारी पोलिसांसोबत सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य गणेश मांगले यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्या वेळी सुमारे साडेसात फूट लांब व १.३ फूट रुंद व्यास असलेल्या दोन तोफा आढळल्या. या तोफांच्या प्रत्येकी ६ रिंग्स असून, या तोफा लांब पल्ल्याचा मारा करण्यासाठी वापरल्या जात होत्या, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.या तोफांकडे राज्य पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष झाल्याबाबात सह्याद्री प्रतिष्ठानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या तोफांचे संवर्धन व्हावे, म्हणून प्रतिष्ठानने तातडीने राज्य पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार केला. त्यात संबंधित तोफा प्रशासनाने त्यांच्या संग्रहात किंवा हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवडी किल्ल्यावर ठेवण्याची मागणी प्रतिष्ठानने केली आहे.दीर्घकाळापासून धूळखात पडल्याने, या तोफांना गंज लागण्यास सुरुवात झाली आहे. उघड्यावर असलेल्याया तोफांवर चोरट्यांची नजर पडल्यास, त्यातील धातूंची चोरी होण्याची भीती आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेतली नाही, तर हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची शक्यता रघुवीर यांनी व्यक्त केली आहे.कार्यवाहीस सुरुवातपुरातत्त्व खात्याचे संचालकडॉ. तेजस गर्गे यांनी या तक्रारीची दखल घेत तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाºयांना या तोफांची पाहणी करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत, असे गर्गे यांनी सांगितले. तसेच या तोफांचे संवर्धन करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
सतराव्या शतकातील तोफा धूळखात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 7:14 AM