Join us

राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांना सातवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 8:52 PM

 शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर केला असून शिक्षकांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. 

मुंबई : शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर केला असून शिक्षकांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. याबाबतीत आज भाजपा शिक्षक प्रदेश आघाडीचे मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी दिवसभर मंत्रालयात ठाण मांडून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव वंदना कृष्णा व उपसचिव चारुशीला चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा  केली. शिक्षक व शिक्षकेतरांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू करण्याबाबतचा जी आर कधी निर्गमित करणार अशी विचारणा केली त्यावर शालेय शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी काम करीत असून लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचे आश्वासीत केले. व वित्त विभागाला प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे सहसंयोजक बयाजी घेरडे, निरंजन गिरी, सुभाष अंभोरे, शेखर भारती इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रेयवादासाठी संघटनांकडून शिक्षकांची दिशाभूल शिक्षण विभागाकडून सातवा वेतन आयोग लागू होत असून याचे श्रेय लाटण्याकरिता काही संघटनांकडून अपप्रचार केला जात असुन आता शिक्षण विभागाकडून वित्त विभागाला प्रस्ताव सादर केला जाणार असल्याने व तसे लेखी उत्तर दिल्याने शिक्षक व शिक्षकेतरांमधील  संभ्रम दूर झाला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रशिक्षक