साडेपाच लाख शिक्षकांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू नाही; मार्चमधील वेतनही सहाव्या आयोगानुसारच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 06:15 AM2019-02-22T06:15:01+5:302019-02-22T06:15:25+5:30

राज्य कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची सूचना ३० जानेवारी रोजी निघाली.

Seventh Pay Commission for five and a half million teachers is yet to be implemented; According to the Sixth Commission in March | साडेपाच लाख शिक्षकांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू नाही; मार्चमधील वेतनही सहाव्या आयोगानुसारच

साडेपाच लाख शिक्षकांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू नाही; मार्चमधील वेतनही सहाव्या आयोगानुसारच

Next

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार मार्चमध्ये वेतन मिळणार साडेपाच लाख शालेय व पदव्युत्तर शिक्षकांना मात्र सहाव्या वेतन आयोगानसुार वेतन मिळणार आहे.

राज्य कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची सूचना ३० जानेवारी रोजी निघाली. त्यानुसार वाढीव वेतनासह वेतन बिले विविध कार्यालयांनी कोषागार कार्यालयांकडे पाठविली. त्यामुळे त्यांना तसे वेतन (फेब्रुवारी पेड इन मार्च) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, लाखो शिक्षकांसाठी अधिसूचना न काढल्याने मार्चमध्ये त्यांना तो फायदा मिळाला नाही. शिक्षक आमदार कपिल पाटील म्हणाले की, शिक्षण विभागाकडे आम्ही अधिसूचना काढण्यासाठी वारंवार विचारणा केली पण हे काम वित्त विभागाचे आहे, असे आम्हाला सांगण्यात आले. शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यास विलंब केल्याने हा गोंधळ झाला.
शालेय शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी म्हणाल्या की, वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याची छाननी सुरू आहे आणि एक आठवड्यात अधिसूचना निघेल. शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसारचे वेतन एप्रिलमध्ये मिळेल.

Web Title: Seventh Pay Commission for five and a half million teachers is yet to be implemented; According to the Sixth Commission in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.