सातवा वेतन आयोग; दुसरा हप्ता एक वर्षाने पुढे ढकलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 04:36 AM2020-06-24T04:36:30+5:302020-06-24T04:36:33+5:30
सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता एक वर्ष पुढे ढकलला आहे. वित्त विभागाने मंगळवारी याबाबतचा आदेश काढला.
मुंबई : आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत असलेल्या राज्य शासनाने आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता एक वर्ष पुढे ढकलला आहे. वित्त विभागाने मंगळवारी याबाबतचा आदेश काढला.
हा दुसरा हप्ता १ जुलै रोजी देय होता. मात्र आता तो राज्य कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक वर्ष मिळणार नाही. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी ही पाच समान हप्त्यांमध्ये पाच वर्षांत देण्याचा निर्णय आधीच्या सरकारने घेतला होता, त्यानुसार पहिला हप्ता गेल्यावर्षी कर्मचाºयांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करण्यात आला होता. आता हा दुसरा हप्ता कधी जमा केला जाईल याची तारीख सरकारने दिलेली नाही. त्याचा स्वतंत्र आदेश काढण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. आर्थिक अडचणींमुळे शासनाने मार्चचा पगार दोन हप्त्यांत दिला होता. दुसरा हप्ता मिळालेला नाही.