Join us

सेप्सिसच्या संसर्गाने ६,१५१ नवजात बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 2:40 AM

राज्यातील आकडेवारी : मुंबईत झाली सर्वाधिक बळींची नोंद

स्नेहा मोरे ।मुंबई : राज्यात दोन वर्षांत सेप्सिसच्या संसर्गाने ६ हजार १५१ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. नोकरदार महिला आणि बदलत्या संस्कृतीमुळे स्तनपानाकडे होणारे दुर्लक्ष हे यामागील एक कारण आहे. प्रत्यक्षात स्तनपानामुळे बालकांमध्ये आजार आणि संसर्गाचा धोका टळतो.राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील नऊ महिन्यांत मुंबई शहर, उपनगरात ८८८ नवजात बालकांना सेप्सिसमुळे जीवास मुकावे लागले. २०१८-१९ साली ही संख्या ६३२ एवढी होती. राज्यात सेप्सिसच्या सर्वाधिक बळींची नोंदही मुंबईत झाली, मात्र त्यात स्थलांतरित रुग्ण संख्येचाही समावेश आहे. मुंबईखालोखाल पुण्यात ७७० नवजात बालकांच्या मृत्यूंची नोंद झाली. वाशिम जिल्ह्यात नऊ महिन्यांत सर्वांत कमी म्हणजे केवळ चार बालकांचा मृत्यू झाला, तर २०१८-१९ साली तेथे एकाही बालकाच्या मृत्यूची नोंद नाही.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गणेश रणदिवे यांनी सांगितले की, कोलोस्ट्रम हा घटक आईच्या शरीरात सर्वप्रथम तयार होणारे दूध असते. आतड्यांची वाढ आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी ते आवश्यक असते. या दुधात ओमेगा-३ सारखे मेदयुक्त घटक असतात.जे मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळांच्या मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असतात. मातेच्या दुधाचे प्रमाण वाढते तेवढाच सडन इन्फंट डेथ सिन्ड्रोम (एसआयडीएस), अ‍ॅलर्जी, लहानपणी होणारा मधुमेह आणि स्थूलपणाचा धोका कमी होतो.दररोज १० मिली जास्त दूध प्यायल्यास सेप्सिसचा धोका १९ टक्क्यांनी कमी होतो. मातेच्या दुधात लॅक्टोज आणि चरबीनंतर मानवी दुधामध्ये याची मात्रा सर्वाधिकअसते. स्तनपान करणाऱ्या शिशूंमध्ये कानाचे संक्रमण, न्यूमोनिया,पोटाचे विषाणू आणि अतिसार, लिम्फोमा आणि ल्युकेमिया, कर्करोग, क्रोहन, दमा, अ‍ॅलर्जी, इसब,मधुमेह, अर्भक मृत्यू सिंड्रोम (एसआयडीएस) होण्याची शक्यता खूपच कमी असते.सेप्सिस म्हणजे काय?कोणत्याही जंतूचा संसर्ग अथवा प्रादुर्भाव झाल्याने शरीराच्या विविध अवयवांवर होणाºया परिणामांमुळे ‘सेप्टिसिमिया’ (सेप्सिस) होतो. सेप्सिसच्या चुकीच्या समजुतीमुळे याला ब्लड पॉयझनिंग समजले जाते. सेप्सिसमुळे शरीराच्या कोणत्याही जखमांमध्ये संसर्ग होतो, तसेच यामुळे शरीरातील पेशी, अवयवांची मोठी हानी होते.येथे झालेसर्वाधिक मृत्यूठिकाण मृत्यूमुंबई 1520पुणे 770गडचिरोली 626ठाणे 360 

टॅग्स :मुंबईमृत्यू