ममताच्या जिद्दीची गोष्ट... मेंदूच्या आजारामुळे शाळांनी प्रवेश नाकारला, तिने 90 % मिळवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:41 PM2019-05-07T19:41:07+5:302019-05-07T19:43:16+5:30
ममता नायक या 17 वर्षीय विद्यार्थींनीला काही वर्षांपूर्वी अनेक शाळांनी प्रवेश देणे नाकारले होता.
मुंबई - मेंदूचा आजार म्हणजेच छिन्नविमनस्कतेमुळे मुलांना किंवा रुग्णांना स्वतंत्रपणे लिखाण करणे किंवा स्पष्ट बोलणे शक्य होत नाही. मात्र, फिजिओथेरपी उपचार पद्धतीद्वारे ममताने आपला अभ्यास आणि आजारावर समतोल साधला. जिद्दीच्या जोरावर ममताने 500 पैकी 452 गुण मिळवत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. ममताला गणिताच्या पेपरमधून सूट मिळाली होती. त्याबदल्यात तिची तोंडी परीक्षा घेण्यात आली होती.
ममता नायक या 17 वर्षीय विद्यार्थींनीला काही वर्षांपूर्वी अनेक शाळांनी प्रवेश देणे नाकारले होता. ममताच्या छिन्नविमनस्कता आणि मेंदूतील विचारांच्या बदलाच्या आजाराचे कारण पुढे करत ममताला अनेक शाळांनी प्रवेश नाकारला होता. मात्र, आज अंधेरी वेस्टमधील राजहंस विद्यालयाची विद्यार्थीनी ममत नायक स्टार बनली आहे. ममताने दहावीच्या सीबीएससी परीक्षेत तब्बल 90.4 टक्के गुण मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
छिन्नविमनस्कता या आजारातील रुग्ण स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. कृती एक आणि विचार दुसराच, अशीच त्यांची अवस्था आहे. तसेच स्वतंत्रपणे ते चालूही शकत नाहीत. मात्र, ममताने फिजीओथेरपी उपचार पद्धतीने आपल्या या आजारावर मात करत, मोठ्या जिद्दीने 500 पैकी 452 गुण मिळवून एक प्रेरणादायी चित्र उभारले आहे. या परीक्षेसाठी ममताला गणित विषयाच्या पेपरमध्ये सूट देण्यात आली होती. त्याबदल्यात तिच्याकडून इतर विषयाची तोंडी परीक्षा घेण्यात आली.
ममताने आपल्या जिद्दीने दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे, ममता एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिका दिपशिक्षा श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. शाळेतील शिक्षकांसाठीही ममता प्रेरणादायी आहे. ममता ही प्रेमळ आणि कष्टाळू मुलगी असून तिचे आणखी मोठे यश पाहायचे, असचेही श्रीवास्तव यांनी म्हटले.