मुंबई - एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड आणि त्याला शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी दिलेली साथ यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही तासांतील घडामोडींमुळे ठाकरे सरकार अल्पमतात आल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर दुपारी एक वाजल्यापासून मंत्रालयात मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. मात्र या बैठकीला आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे अनेक प्रमुख मंत्री अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे या अनुपस्थितीमागे नेमकं कारण काय याची चर्चा होत आहे.
कोरोनाची अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. मात्र आदित्य ठाकरे, दादा भुसे, सुभाष देसाई, उदय सामंत हे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित आहेत.
दरम्यान, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्य़े कोणता महत्त्वाचा निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच काही वेळापूर्ण विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्विट केल्याने आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा काही निर्णय होतो का याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.