Join us

महाराष्ट्रात हुडहुडी कायम! मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका 

By सचिन लुंगसे | Published: January 24, 2024 6:51 PM

बुधवारीही मुंबईचे किमान तापमान १५ अंश नोंदविण्यात आले.

मुंबई: मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका कायम असून, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पडलेल्या थंडीने मुंबईकरांना गारेगार केले आहे. बुधवारीही मुंबईचे किमान तापमान १५ अंश नोंदविण्यात आले असून, आणखी दोन दिवस मुंबईकरांना थंडीचा आनंद लुटता येणार आहे. तर राज्याचा विचार करता २५ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात घट होईल. किमान तापमान १० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, अस अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. २६ जानेवारीपर्यंत मुंबईत थंडी कायम राहिल. त्यानंतर तापमानात किंचित वाढ होईल. कमाल तापमान ३३ अंश नोंदविण्यात येईल. फेब्रूवारीच्या पहिल्या आठवड्यात पारा पुन्हा खाली येईल. किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात येईल. १५ फेब्रूवारीपर्यंत मुंबईकरांना थंडीचा आनंद घेता येईल. - राजेश कपाडीया, वेगरिज ऑफ दी वेदर शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये... 

  • नंदुरबार ८.५
  • नाशिक ९
  • पुणे ९.७
  • अहमदनगर ९.३
  • जळगाव ९.९
  • मालेगाव १०
  • वाशिम १०.२
  • छत्रपती संभाजी नगर १०.४
  • बुलडाणा ११
  • महाबळेश्वर ११.४
  • जेऊर ११.५
  • अकोला १२
  • अमरावती १२.१
  • यवतमाळ १२.२
  • परभणी १२.५
  • गडचिरोली १२.६
  • सातारा १३
  • गोंदिया १३.५
  • बीड १३.५
  • सांगली १३.९
  • वर्धा १४
  • कोल्हापूर १४.२
  • नागपूर १४.६
  • नांदेड १५
  • डहाणू १५.१
  • मुंबई १५.२
  • अलिबाग १५.३
  • धाराशीव १५
  • सोलापूर १५.४
  • पालघर १६.५
  • रत्नागिरी १६.१
  • चंद्रपूर १६.२
टॅग्स :मुंबई