रेल्वे दरवाढीबाबत वसईत तीव्र पडसाद

By admin | Published: June 21, 2014 10:46 PM2014-06-21T22:46:58+5:302014-06-21T22:46:58+5:30

रेल्वे भाडेवाढीचे पडसाद वसई-विरार भागात तीव्रतेने उमटले आहेत.

The severe depression of the railway giant | रेल्वे दरवाढीबाबत वसईत तीव्र पडसाद

रेल्वे दरवाढीबाबत वसईत तीव्र पडसाद

Next
>वसई : रेल्वे भाडेवाढीचे पडसाद वसई-विरार भागात तीव्रतेने उमटले आहेत. नव्या सरकारने ही भाडेवाढ करून सर्वसामान्यजनांच्या तोंडाला पाने पुसल्याची जळजळीत प्रतिक्रीया अनेकांनी लोकमतकडे व्यक्त केली. यासंदर्भात एका वृद्ध रेल्वेप्रवाशाने प्रतिक्रीया देताना ‘अबकी बार, मोदी की मेहंगाई बढाओ सरकार’ सांगितले. अचानकरित्या झालेल्या या भाडेवाढीचा सर्वत्र निषेध होत होता.
 
रेल्वेच्या विविध प्रकल्पाचे अभ्यासक म्हणून ओळख असणारे माजी खा. राम नाईक यांनी त्यांच्या सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल स्वत:चे म्हणणो मांडावे. प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पावर चर्चा करणा:या नाईक यांना आपल्याच सरकारने केलेली दरवाढ मान्य आहे का हे लोकांना कळायला हवे. कारण आपला तो बाब्या व दुस:याचा तो काटर्य़ा असे होता कामा नये. सरकारच्या या निर्णयामुळे आमचे अच्छे नाही पण बुरे दिन नक्कीच येणार. 
सुदेश चौधरी, सभापती, प्रभाग समिती ब,
वसई-विरार शहर मनपा
 
भारतातील गोरगरीब जनतेला भरमसाट आश्वासने देत सत्तेत आलेल्या भाजपाने एका महिन्याच्या आतच जनतेवर अन्याय केला आहे. काँग्रेसच्या राजवटीत गॅस, रेल्वे दरवाढ यावर निदर्शने करणा:या भाजपाच्या कार्यकत्र्यानी आता रस्त्यावर उतरून आपल्याच सरकारविरोधात निदर्शने करावीत अशी अपेक्षा आहे.
मनवेल तुस्कानो, अध्यक्ष, निर्भय जनमंच
 
रेल्वेच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. प्रवासी व मालवाहतूक भाडेवाढ अशी दुहेरी कु:हाड आम्हा सर्वसामान्यजनांवर कोसळली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम विविध क्षेत्रवर नक्कीच होणार याबाबत दुमत नाही. मालवाहतूक भाडेवाढीमुळे फळभाज्या, दूध, अन्नधान्य व अन्य पदार्थाच्या भावातही प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
अजीव पाटील, सभापती, स्थायी समिती, वसई-विरार मनपा
 
या भाडेवाढीच्या निमित्ताने रालोआ सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. निवडणुकीच्या दरम्यान सर्वसामान्यांना दिलासा देणारे सरकार असेल म्हणून प्रचार करणा:या भाजपाने या प्रश्नावर तोंड उघडावे अशी अपेक्षा आहे.
अशोक पेंढारी, सरचिटणीस, ठाणो जिल्हा काँग्रेस समिती
 
सरकारने केलेल्या या दरवाढीचा परिणाम आमच्या मत्स्यव्यवसायावरही जाणवणार आहे. आमच्या अनेक महिला विक्रेत्या मुंबईहून माशांच्या पाटय़ा घेऊन येतात. त्यांना आता मासिक पासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार असल्याने माशांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. सरकारने दरवाढ केली असली तरी समाजातील अनेक घटकांचा विचार करून सवलत द्यावी अशी अपेक्षा आहे.
राजू तांडेल, अध्यक्ष, मच्छीमार स्वराज्य समिती

Web Title: The severe depression of the railway giant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.