शिवडी क्षयरोग रुग्णालयात, सर्व सोयीसुविधा पुरविणार; वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:43 IST2025-03-20T12:41:40+5:302025-03-20T12:43:59+5:30

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

Sewri Tuberculosis Hospital, all facilities will be provided; Information from Minister of State for Medical Education Madhuri Misal | शिवडी क्षयरोग रुग्णालयात, सर्व सोयीसुविधा पुरविणार; वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

शिवडी क्षयरोग रुग्णालयात, सर्व सोयीसुविधा पुरविणार; वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

मुंबई : शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयाला आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. आ. श्रीकांत भारतीय यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

 विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आदी संवर्गातील २० पदे कार्यरत आहेत. तर, ३३ पदे कंत्राटी तत्त्वावर भरली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सोयीसुविधा कोणत्या?
क्षयरोग रुग्णालयात बाल क्षयरोग कक्ष, अद्ययावत शस्त्रक्रियागार, १० खाटांचे उरोरोग अतिदक्षता विभाग, फुप्फुसीय पुनर्वसन केंद्र, २४ तास क्ष-किरण सुविधा, क्लिष्ट आजार असलेल्या क्षयरुग्णांसाठी इको इंडियासारख्या उपक्रमांशी संलग्नता, डिस्ट्रिक्ट रेसिडेन्सी प्रोग्राम अंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या डॉक्टरांची नियुक्ती यांसारख्या सेवासुविधा सुरू करण्यात आल्या आहेत, असेही मंत्री मिसाळ यांनी सांगितले.

Web Title: Sewri Tuberculosis Hospital, all facilities will be provided; Information from Minister of State for Medical Education Madhuri Misal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.