मुंबई : गोरेगावच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिनेत्री अमृता धनाव (३२) आणि रिचा सिंह (२६) या दोघी ‘सेक्स रॅकेट’ चालवत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. यात, दोघींनाही ग्राहकांकडून पैसे घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. स्वामी यांना मिळाली होती. त्यानुसार, समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू कसबे यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव पूर्वच्या ‘वेस्टइन’ या पंचतारांकित हॉटेलमधून या दोघींना अटक करण्यात आली. पोलिसांच्या एका खबरीने बनावट ग्राहक बनत धनाव हिला फोन करून हाय प्रोफाइल मॉडेलची मागणी केली. तेव्हा एका रात्रीचे १ लाख रुपये लागतील, असे धनावने त्याला सांगितले. हॉटेलमध्ये रूम आरक्षित केल्याचे या ग्राहकाने तिला सांगितले. मॉडेलला त्याच ठिकाणी घेऊन येण्यासही त्याने सांगितले.पैशाचा व्यवहार हॉटेलमध्ये करू, असे आश्वासन त्याने तिला दिले. तेव्हा धनाव आणि सिंह त्याच्यावर विश्वास ठेऊन पैसे घेण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या. पैसे स्वीकारत असताना कसबे यांच्या पथकाने त्या दोघींना पकडले. त्यावेळी ‘मी एक नामांकित अभिनेत्री असून, एका चित्रपट निर्मात्यासोबत मीटिंगला आले. माझा माजी प्रियकर आणि एका मालिकेतील स्पर्धक आपल्याला यात अडकवत आहेत,’ असे तिचे म्हणणे होते. मात्र, दिंडोशी पोलिसांनी या दोघींना अटक केली.
पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘सेक्स रॅकेट’चा पदार्फाश, अभिनेत्रींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 4:51 AM