पाच वर्षांच्या मुलीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 03:10 AM2018-09-07T03:10:44+5:302018-09-07T03:11:50+5:30

बीड येथील ललिता साळवे हिच्या लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आता पुन्हा एकदा एका पाच वर्षीय मुलीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया (जनायटल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी) पार पडेल.

 Sex rearrangement surgery at St. George's Hospital on a five-year-old daughter | पाच वर्षांच्या मुलीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया

पाच वर्षांच्या मुलीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया

googlenewsNext

मुंबई : बीड येथील ललिता साळवे हिच्या लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आता पुन्हा एकदा एका पाच वर्षीय मुलीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया (जनायटल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी) पार पडेल. शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा शुक्रवारी पार पडणार असल्याची माहिती रुग्णालयाचे प्लास्टीक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. रजत कपूर यांनी दिली.
ललिता साळवे हिच्या लिंगबदलाच्या निर्णयानंतर या विषयाबद्दल जाहीरपणे चर्चा सुरू झाली. ललिताबाबत माहिती मिळाल्यावर रेश्माच्या (नाव बदललेले) कुटुंबाने रुग्णालयाशी संपर्क साधला. गुरुवारी सकाळी रेश्मा तिच्या वडिलांसोबत रुग्णालयात दाखल झाली. वैद्यकीय तपासणीनंतर लिंग पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी तिची अल्ट्रासाऊंड चाचणी झाली, त्यानंतर आता तिला रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्यावर गुरुवारी लिंग पुनर्रचनेतील पहिली प्राथमिक शस्त्रक्रिया पार पडणार आहे.

‘याला लिंगबदल म्हणता येणार नाही’
डॉ. रजत कपूर म्हणाले, मुलीच्या शरीरात लिंगाजवळ आधीच पुरुष टेस्टीकल्स होते. त्याची पूर्ण वाढ झाली नाही. त्यामुळे पालकांनी तिला मुलगी म्हणूनच वाढविले. परंतु तिचे शरीर पुरुषाचे आहे. लिंग पुनर्रचनेनंतर तिचे लिंग पुरुषांप्रमाणे वाढेल, मात्र याला लिंगबदल म्हणता येणार नाही.

Web Title:  Sex rearrangement surgery at St. George's Hospital on a five-year-old daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई