सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 16:26 IST2025-04-20T16:26:05+5:302025-04-20T16:26:33+5:30
पवईतील नामांकित कंपनीत मॅनेजर असलेल्या तरुणाने क्वॅक क्वॅक डी डेटिंग अॅप डाउनलोड केले होते. या अॅपवर तो तरुणींशी गप्पा मारत असे.

सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
मुंबई : एका २३ वर्षीय तरुणाचे विवस्त्र व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा प्रकार पवईमध्ये घडला. याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी एका महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पवईतील नामांकित कंपनीत मॅनेजर असलेल्या तरुणाने क्वॅक क्वॅक डी डेटिंग अॅप डाउनलोड केले होते. या अॅपवर तो तरुणींशी गप्पा मारत असे. अॅपमधील दिव्या नावाच्या प्रोफाइलवरून त्याला ४ एप्रिलला फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवण्यात आली.
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
दोघांनी नंतर व्हॉट्सअप चॅटवर गप्पा मारायला सुरुवात केली. गप्पा सुरू असताना ६ एप्रिलला सायंकाळी ५:१५ च्या सुमारास तरुण कार्यालयात असताना दिव्याने त्याला व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी ती विवस्त्र अवस्थेत होती. त्यानंतर मेसेज करून त्यालाही विवस्त्र व्हायला सांगितले. त्याने ऑफिसच्या वॉशरूममध्ये जाऊन तिला व्हिडीओ कॉल करून तिच्या सांगण्याप्रमाणे केले.
पुरुषाने फोन करून दिली धमकी
तरुणाचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ आणि एडिट करून त्याला पाठवले. याबाबत त्याने दिव्याला व्हॉट्सअॅपवर विचारणा केली. त्यावेळी तिच्या मोबाइलवरून आलेल्या व्हॉइस कॉलद्वारे एका पुरुषाने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २० हजार रुपयांची मागणी केली. तरुणाने त्याला पैसे पाठवताच आणखी ३० हजारांची मागणी करण्यात आली.
तरुणाच्या म्हणण्यानुसार त्याच्या भावाला, मित्राला आणि एका क्लाइंटला व्हिडीओ आणि फोटो आरोपींनी पाठवले. याबाबत तरुणाने त्याच्या मित्राच्या सल्ल्याने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७,६७ (अ), बीएनएस कायद्याचे कलम ३(५).३०८(२) अंतर्गत गन्हा नोंदवला आहे.