मुंबई : घाटकोपरमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी एका गतिमंद मुलीवर बलात्कार करत त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करत सोशल मीडियावर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी स्वच्छतागृहात गेली होती. तेव्हा तिघांनी तिला जबरदस्तीने शौचालयात नेले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी सगळा प्रकार मोबाइलवर रेकॉर्ड केला.
इतकेच नव्हे, तर त्यांनी तो सोशल मीडियावर अपलोड केला. दरम्यान, मुलीच्या भावालाच या व्हिडीओची माहिती मिळाली आणि त्याने कुटुंबीयांना याबाबत कळविले. त्यानंतर कुटुंबीयांनी घाटकोपर पोलिसांत तक्रार नोंदविली. तीनही अल्पवयीनांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.