Join us

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 2:31 AM

पंधरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार जोगेश्वरीमध्ये बुधवारी रात्री उघडकीस आला.

मुंबई : पंधरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार जोगेश्वरीमध्ये बुधवारी रात्री उघडकीस आला. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी एका टेलरला अटक केली आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एम. गवस (३६) असे अटक करण्यात आलेल्या टेलरचे नाव आहे.जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पमध्ये गवस कपडे शिवण्याचेकाम करतो. पीडित मुलगीही याच परिसरात राहत होती. गवसने बहाणा करून मुलीला सोबत नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.या प्रकरणी पीडितेची आई आणि गवसने तिला मारहाण करीत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणाला वाचा फोडल्याने हा प्रकार उघडकीस आला. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी गवसला अटक केली.पीडितेच्या आईला सहआरोपी बनविण्यात आले आहे. सध्या ती दुबईला नोकरीनिमित्ताने गेली असून तिच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदीश कालपाड यांनी सांगितले.