Join us

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

By admin | Published: June 28, 2017 3:37 AM

अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यानंतर त्यांचे न्यूड फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यानंतर त्यांचे न्यूड फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला वरळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संदेश सुदर्शन कांबळे (२४) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या मोबाइलमधून अन्य काही मुलींचे न्यूड व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत.वरळी परिसरात तक्रारदार अल्पवयीन मुलगी राहते. फेसबुकवरून तिची कांबळेसोबत ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने तिच्यासोबत शेअर केलेले फोटो आईला दाखविण्याची धमकी देत सुरुवाताली ८५ हजार रुपये उकळले. त्यानंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले. यादरम्यान २० पेक्षा जास्त वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच आरोपीला पकडण्यासाठी दादर पोलिसांनी सापळा रचला. कांबळेला अटक केली. त्याला वरळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कांबळेने अशाप्रकारे सहा जणांवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तपासात समोर येत आहे. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.