शाबीर खानने लावली वांद्र्याची आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:39 AM2017-10-30T05:39:09+5:302017-10-30T05:39:22+5:30

वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा, गरीबनगर झोपडपट्टीतील अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेतर्फे गुरुवारी कारवाई सुरू असतानाच..

Shabir Khan | शाबीर खानने लावली वांद्र्याची आग

शाबीर खानने लावली वांद्र्याची आग

googlenewsNext

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा, गरीबनगर झोपडपट्टीतील अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेतर्फे गुरुवारी कारवाई सुरू असतानाच, दुपारी लागलेल्या आगीप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी शाबीर खान (२९), या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. येथील पाडकामाची कारवाई थांबविण्यासाठी शाबीर खान याने आग लावल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, त्याला साथ देणाºया अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या अवैध बहुमजली झोपडपट्टीत पाडकामाच्या कारवाईला सुरुवात केली. दुपारी येथील अधिकारी कारवाई करून जेवायला गेले. हीच संधी साधून खान याने एका
झोपडीला आग लावली आणि याच घरातील घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. परिणामी, आगीने सर्वत्र पेट घेतला. खान याचा गारमेंटचा व्यवसाय असल्याचे पोलिसानी सांगितले.
या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू असतानाच या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. यात अरविंद घाडगे
या अग्निशमन दलाच्या जवानाचा समावेश होता.
वांद्रे येथील भाभा रुग्णालयात घाडगे यांना दाखल करण्यात आले होते. दुसºया किरकोळ जखमीचे नाव रिझवान
सय्यद असून, सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता.

Web Title: Shabir Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग