मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा, गरीबनगर झोपडपट्टीतील अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेतर्फे गुरुवारी कारवाई सुरू असतानाच, दुपारी लागलेल्या आगीप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी शाबीर खान (२९), या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. येथील पाडकामाची कारवाई थांबविण्यासाठी शाबीर खान याने आग लावल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, त्याला साथ देणाºया अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या अवैध बहुमजली झोपडपट्टीत पाडकामाच्या कारवाईला सुरुवात केली. दुपारी येथील अधिकारी कारवाई करून जेवायला गेले. हीच संधी साधून खान याने एकाझोपडीला आग लावली आणि याच घरातील घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. परिणामी, आगीने सर्वत्र पेट घेतला. खान याचा गारमेंटचा व्यवसाय असल्याचे पोलिसानी सांगितले.या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू असतानाच या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. यात अरविंद घाडगेया अग्निशमन दलाच्या जवानाचा समावेश होता.वांद्रे येथील भाभा रुग्णालयात घाडगे यांना दाखल करण्यात आले होते. दुसºया किरकोळ जखमीचे नाव रिझवानसय्यद असून, सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता.
शाबीर खानने लावली वांद्र्याची आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 5:39 AM