मुंबईकरांची सावली झाली गायब, शून्य सावली दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 03:52 AM2020-05-16T03:52:24+5:302020-05-16T03:52:38+5:30

सावली गायब म्हणजे पायाखाली येते. त्यामुळे ती स्वत:लादेखील दिसेनाशी होते. खगोलशास्त्रीय भाषेत याला झिरो शॅडो असे संबोधले जाते.

 The shadow of Mumbaikars has disappeared, zero shadow day | मुंबईकरांची सावली झाली गायब, शून्य सावली दिवस

मुंबईकरांची सावली झाली गायब, शून्य सावली दिवस

Next

मुंबई : मुंबईकरांची सावली शुक्रवारी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी गायब झाली; थोडक्यात स्वत:च्याच पायाखाली आली. याला वैज्ञानिक निमित्त होते ते शून्य सावली दिवसाचे, कारण आता शून्य सावलीचे दिवस सुरू झाले आहेत.
सावली गायब म्हणजे पायाखाली येते. त्यामुळे ती स्वत:लादेखील दिसेनाशी होते. खगोलशास्त्रीय भाषेत याला झिरो शॅडो असे संबोधले जाते. ३ मेपासून सुरू झालेला हा सावल्यांचा खेळ महाराष्टÑात ३१ मेपर्यंत सुरू राहील. विविध ठिकाणी दुपारी १२ ते १२:३० या कालावधीत शून्य सावलीचा अनुभव घेता येईल.
सूर्य डोक्यावरून असतो, तेव्हा उन्हातील व्यक्ती किंवा वस्तूची सावली पुढे-मागे न पडता खाली पायातच पडते. मात्र, ज्या वेळी काही क्षण ही सावली गायब होते, त्या घटनेला खगोलशास्त्रीय भाषेत झिरो शॅडो किंवा शून्य सावली असे म्हणतात. सध्या उत्तरायण असल्याने कडाक्याचे ऊन पडले असून, राज्यातील विविध शहर व ग्रामीण भागात हा अनुभव दरदिवशी घेता येईल. भारतात शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० अंशावरून कर्कवृत्त जाते. त्यामुळे हा प्रदेश शून्य सावलीचा शेवटचा भूभाग आहे. भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावली ही घटना घडत नाही, कारण डोक्यावर लंबरूप सूर्य किरणे येथे पडू शकत नाहीत. महाराष्ट्रात मे ते जुलै अशा दोन्ही महिन्यांत असा अनुभव घेता येतो. मे महिन्यात उन्हाळा असल्यामुळे हा अनुभव घेता येतो. मात्र, जुलैमध्ये ढगाळ वातावरणामुळे तो क्वचितच अनुभवता येतो.

महाराष्ट्रात मे ते जुलै अशा दोन्ही महिन्यांत असा अनुभव घेता येतो. मे महिन्यात उन्हाळा असल्यामुळे हा अनुभव घेता येतो. मात्र, जुलैमध्ये ढगाळ वातावरणामुळे तो क्वचितच अनुभवता येतो.

शून्य सावलीचे काही महत्त्वाचे दिवस आणि ठिकाणे

१६ मे - बोरीवली, ठाणे, कल्याण, डोंबिवली,
भिवंडी, खोडद, अहमदनगर, परभणी
१७ मे - नालासोपारा, विरार, आसनगाव, बसमत
१८ मे - पालघर, कसारा, संगमनेर, श्रीरामपूर,
अंबड, हिंगोली
१९ मे - डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर,
औरंगाबाद, जालना, पुसद
२० मे - तलासरी, मेहेकर, वाशिम, वणी,
चंद्रपूर, मूळ
२१ मे - मनमाड, कन्नड, चिखली
२२ मे - मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा,
यवतमाळ, आरमोरी
२३ मे - खामगाव, अकोला, वर्धा
२४ मे - धुळे, जामनेर, शेगाव, निम्बोरा, उमरेड
२५ मे - साक्री, अमळनेर, जळगाव,
भुसावळ, अमरावती
२६ मे - चोपडा, परतवाडा, नागपूर
२७ मे - नंदुरबार, शिरपूर, गोंदिया
२८ मे - शहादा, पांढुरणा

Web Title:  The shadow of Mumbaikars has disappeared, zero shadow day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई