मुंबई- पोलीस मुख्यालयातील कर्तबगार महिला पोलिस अधिकारी छाया नाईक(55) यांचं कर्करोगाने नुकतेच विलेपार्ले (पश्चिम) येथील मुंबादेवी होमिओपॅथी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर बोरीवली (पूर्व )दौलत नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी अनेक पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. छाया नाईक यांच्या पश्च्यात आई, 5 बहिणी असा परिवार आहे.लोकमतने जागतिक महिला दिनानिमित्त छायाच्या कार्याची दखल घेतल्यावर लोकमतची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.त्यावेळी तीच्या अनेक हितचिंतक व राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी तीचे कौतुक केले होते अशी माहिती तीची बहिण मेघा नाईक-शाह यांनी लोकमतला दिली. छाया नाईक एक असे व्यक्तिमत्व जीने तीचे संपूर्ण आयुष्यच त्याग आणि समर्पणातच वेचलं. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या 16 व्या वर्षी तीच्यावर घराची जबाबदारी येऊन पडली.आयुष्यातली स्वर्णगथ समोर आली आणि स्वतः अविवाहित राहून तीने तीच्या लहान बहिणींची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून स्वतःच्या आईचाही सांभाळ केला.पोलिस खात्यात 37 वर्षे सचोटीने नोकरी केली होती.छाया ही गेली काही वर्षे असाध्य रोगाशी दोन हात करून लढा देत होती.अशा परिस्थितीत देखील पोलिस खात्यात आपले कर्तव्य मनोभावे पार पाडले होते.आजार बाळावल्यामुळे गेली ६ महिने घर व डॉक्टर असा नित्यक्रम झाला होता.मात्र अखेर कर्क रोगाशी लढा देतांना तीची प्राणज्योत माळवली.छायाच्या कार्याचा गौरव म्हणून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनातली जाणीव या दिवाळी अंकातर्फे संपादिका सोनल खानोलकर यांनी शिवाजी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात जेष्ठ प्रशासकीय अधिकारी अश्विनी जोशी व प्रसिद्ध साहित्यिका विजया वाड यांनी सत्कार केला होता.तर मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी देखिल तीच्या घरी जाऊन सत्कार केला होता.
कर्तबगार महिला पोलीस अधिकारी छाया नाईक यांचं कर्करोगाने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 10:40 AM