भर उन्हात हरवणार सावली! - दा.कृ. सोमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 05:30 AM2018-05-07T05:30:41+5:302018-05-07T05:30:41+5:30
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात, तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो, पण दोन टोकांच्या मधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायास मिळतो.
मुंबई : पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात, तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो, पण दोन टोकांच्या मधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायास मिळतो. सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. हाच ‘शून्य सावलीचा’ अनुभव लवकरच राज्यभरात ठरावीक दिवशी घेता येणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली.
१६ मे रोजी मुंबईतून आणि १७ मे रोजी ठाणे, डोंबिवली, कल्याणमधून दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात उभे राहावे. आपली सावली पायाखाली आल्याने दिसणार नाही. यंदा ८ मे रोजी सिंधुदुर्ग, कणकवली, देवगड, राजापूर, मिरज सांगली, ११ मे रत्नागिरी, १२ मे सातारा, सोलापूर, १३ मे उस्मानाबाद, १४ मे रायगड, पुणे, लातूर, १५ मे अंबेजोगाई, १६ मे मुंबई, नगर, परभणी नांदेड, १७ मे ठाणे, डोंबिवली, कल्याण, १९ मे औरंगाबाद, बीड, जालना, चंद्रपूर, २० मे नाशिक, वाशीम गडचिरोली २१ मे बुलडाणा, यवतमाळ, २२ मे वर्धा, २३ मे धुळे, २४ मे भुसावळ, जळगाव या ठिकाणांवरून त्या-त्या दिवशी अनुभव घेता येईल.