मुंबई : महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस असणार आहेत. आपल्या सोबत वर्षभर राहणारी सावली या दिवशी काही मिनिटासाठी आपली साथ सोडून जाणार आहे. भौगोलिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या हे दिवस महत्त्वाचे असून, विद्यार्थी व नागरिकांनी भौगोलिक घटनांचा अभ्यास, निरीक्षण करावे, असे आवाहन खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.
अंदमान - निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस येतो. दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो. शेवटी भोपाल जवळ १८ जून रोजी शून्य सावली दिवस पाहता येतो. लगेच दक्षिणायन सुरु होताच पुन्हा भोपळ ते अंदमानपर्यंत पुन्हा पावसाळ्यात शून्य सावली दिवस येतात. परंतु ढग आणि पाऊस असल्याने हे दिवस अनुभवता येत नाही.
- दुपारी १२ ते १२.३५ या वेळेदरम्यान सूर्य निरीक्षण करावे.- समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल. साहित्य - दोन, तीन इंच व्यासाचा, एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप, कोणतीही उभी वस्तू ठेवावी किंवा स्वता उन्हात सरळ उभे रहावे. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही. सावलीने थोडा वेळ का होईना साथ सोडलेली असेल. मे (दिनांक) - शहरे५ - देवगड, राधानगरी, रायचूर६ - कोल्हापूर, इचलकरंजी७ - रत्नागिरी, सांगली, मिरज८ - कऱ्हाड, जयगड, अफजलपूर९ - चिपळूण, अक्कलकोट१० - सातारा, पंढरपूर, सोलापूर११ - महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाई१२ - बारामती, बार्शी, धाराशीव१३ - पुणे, मुळशी, दौंड, लातूर, लवासा१४ - लोणावळा, अलिबाग, दाभाडे, पिंपरी-चिंचवड, देहू, जामखेड, आंबेजोगाई१५ - मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राळेगण सिद्दी, सिरोंचा१६ - बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नारायण गाव, खोडद, अहमदनगर, परभणी, नांदेड, निर्मल१७ - नालासोपारा, विरार,आसनगाव, अहेरी, आल्लापल्ली१८ - पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा१९ - छत्रपती संभाजी नगर, डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी२० - चंद्रपुर, मेहकर, वाशीम, वणी, मूल२१ - मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना२२ - मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी२३ - खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड२४ - धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर२५ - जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा२६ - नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा२७ - नंदुरबार, शिरपुर, बुऱ्हाणपूर, परतवाडा, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक२८ - अक्कलकुआ, शहादा, पांढुरणा, वरुड, नरखेड२९ - बोराड, नर्मदा नगर३० - धाडगाव३१ - तोरणमाळ