डोळखांब : कल्याणची वालधुनी नदी रसायनांनी प्रदूषित केल्याने शासन जागृत झाले. परंतु आता त्याच कारखानदारांनी आपला मोर्चा शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागाकडे वळविला असून रात्री अपरात्री रसायनांचे टॅँकर्स रस्त्यालगत रिकामे करून पळ काढत आहेत. त्या घातक रसायनांची तीव्रता इतकी असते की, त्या क्षेत्रामधील झुडपे, पालापाचोळा, झाडांची पाने जळून काळा पडत आहे. तर काही ठिकाणी डोळे चुरचुरण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत प्रदूषण मंडळ मात्र अनभिज्ञ आहे.कल्याणच्या वालधुनी नदीमध्ये घातक रसायने टाकणाऱ्या टॅँकर्समुळे काही दिवसांपूर्वी त्या परिसरातील रहिवाशांना प्रकृतीच्या त्रासांना सामोरे जावे लागले होते. रात्रीच्या वेळी रसायने टाकणारे टँकर्स तेथील रहिवाशांनी पकडून दिले होते. तसेच त्या चालकांवर कारवाई केली. यावर आळा घालण्यासाठी काही ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविले. पालकमंत्र्यांनी अशा कारखानदारांवर कारवाईचे संकेत दिले होते. (वार्ताहर)
शहापूर तालुका प्रदूषणाच्या विळख्यात
By admin | Published: February 01, 2015 11:07 PM