Join us  

शाहीर साबळे यांचे निधन

By admin | Published: March 21, 2015 2:24 AM

‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले प्रख्यात शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचे शुक्र वारी मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

मुंबई : ‘महाराष्ट्र माझा’ अशी पहाडी आवाजात गर्जना करणारे व ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले प्रख्यात शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचे शुक्र वारी मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. शाहीर साबळे म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाने त्यांच्या जीवनात एक मोठे यश आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकांच्या कलांना एकत्र आणून त्यांचे सादरीकरण करण्याची कल्पना यामागे होती. वृद्ध व निराधार कलाकारांना स्वाभिमानाने जगता यावे आणि आपली कला तरुण पिढीला शिकविता यावी, यासाठी त्यांनी ‘शाहीर साबळे प्रतिष्ठान’ची स्थापना केली. शाहीर साबळे यांना पद्मश्री किताबासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. प्रसिद्ध सिने व नाट्यदिग्दर्शक केदार शिंदे हे त्यांचे नातू होत. (प्रतिनिधी)