शाहरुख खानला मुंबई मनपाचा दणका, रेड चिलीजच्या बेकायदा हॉटेलवर हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 07:58 AM2017-10-06T07:58:12+5:302017-10-06T11:49:26+5:30
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला मुंबई महानगपालिकेने दणका दिला आहे. गोरेगाव पश्चिम परिसरातील शाहरुखच्या रेड चिलीजच्या ऑफिसवर महापालिकेने कारवाई केली आहे.
मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला मुंबई महानगपालिकेने दणका दिला आहे. गोरेगाव पश्चिम परिसरातील शाहरुखच्या रेड चिलीजच्या ऑफिसवर महापालिकेने कारवाई केली आहे.
शाहरुखच्या रेड चिलीज दोन हजार चौरफ फूट जागेवरील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने हातोडा मारला आहे. महापालिकेच्या पी दक्षिण विभागाने ही धडक कारवाई केली आहे. डीएलएच पार्क या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील अतिक्रमणावर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. रेड चिल्लीज या प्रोडक्शन हाऊसच्या बेकायदा हॉटेलवर मुंबई महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. गोरेगाव पश्चिम येथे स्वामी विवेकानंद मार्गावरील डीएलएच पार्क या इमारतीतील चौथ्या मजल्यावर हे हॉटेल आहे.
गच्चीवरील रेस्टॉरंटला अद्याप पालिकेने मंजुरी दिलेली नाही, मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून हे हॉटेल या इमारतीच्या गच्चीवर दोन हजार चौरस फूट जागेमध्ये चालवण्यात येत होते. रेड चिल्लीज या कंपनीमार्फत शाहरुख खान व त्याची पत्नी गौरी खान चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या कंपनीचे गोरेगाव पश्चिम येथी एस व्ही रोडवर प्रशस्त कार्यालय आहे. रेड चिल्लीज एफ एमचे कार्यालयही याच ठिकाणी आहे. येथील कर्मचाऱ्यांसाठी उपहारगृह नसल्याने हे हॉटेल बांधण्यात आले होते, असे समजते. रेड चिलीज कंपनीच्या कार्यालयातील सुमारे दोन हजार चौरस फूटांची गच्ची अनधिकृत बांधकाम करुन बंद करून हे हॉटेल चालवण्यात येत होते. हे सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.
ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे २५ कामगार- कर्मचारी - अधिकारी यांच्यासह पालिकेच्याच अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी असणा-या पोलीस पथकातील पोलीस कर्मचारीही घटनास्थळी कार्यरत होते. या कारवाईसाठी गॅस कटर, हातोडा यासारखी अवजारेही वापरण्यात आली, अशी माहिती पी. दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी दिली.
#Mumbai: BMC demolished an illegal construction at Shah Rukh Khan’s Red Chillies VFX office in Goregaon yesterday. pic.twitter.com/0kyfln0bbZ
— ANI (@ANI) October 6, 2017
Red Chillies Vfx is a tenant and not the owner of the property mentioned. It is not an operational canteen: Red Chillies in a statement
— ANI (@ANI) October 6, 2017
The building has an open area outside with seating which employees use for eating food that they get from home: Red Chillies in a statement
— ANI (@ANI) October 6, 2017
Part which BMC demolished are energy saving solar panels that provide clean energy to entire Vfx building:Red Chillies on demolition #Mumbai
— ANI (@ANI) October 6, 2017
Red Chillies Vfx is taking this up with the concerned authorities at the BMC:Red Chillies Entertainment Pvt Ltd in a statement on demolition
— ANI (@ANI) October 6, 2017