Join us

शक्ती मिल बलात्कारप्रकरणी फाशीच्या शिक्षेला स्थगिती, तिन्ही दोषींना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:30 AM

मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता, मुंबई उच्च न्यालयाने ही शिक्षा रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देमुंबईमधील महालक्ष्मी येथील शक्ती मिलच्या कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ रोजी ही घटना घडली होती. यामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.

मुंबई - राजधानी मुंबईतील सन २०१३ मधील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी आज मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला. मुंबई सत्र न्यायालयाने ४ डिसेंबर २०१४ रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून आज अंतिम निर्णय देण्यात आला. त्यामध्ये, दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. 

मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता, मुंबई उच्च न्यालयाने ही शिक्षा रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याने समाजाच्या जाणीवेला धक्का बसला आहे, याकडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही. बलात्कार हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. मात्र, हे घटनात्मक न्यायालय असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्यातूनच, उच्च न्यायालयाने दोषींना जन्मठेप दिली आहे. आयपीसीच्या कलम ३७६ (ई) अंतर्गत बलात्काराच्या पुनरावृत्तीच्या गुन्ह्यासाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले हे तिघेही आरोपी पहिलेच होते. त्यामुळे, दोषींना पश्चाताप हीच मोठी शिक्षा असल्याचे सांगत न्यायालयाने खलील जिब्रान यांच्या खटल्याचाही दाखला दिला. तसेच, दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, 

दरम्यान, मुंबईमधील महालक्ष्मी येथील शक्ती मिलच्या कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ रोजी ही घटना घडली होती. यामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. ही महिला छायाचित्रकार होती. ती आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती. मात्र, यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. 

टॅग्स :उच्च न्यायालयमुंबईगुन्हेगारी