Join us

‘शक्ती’ कायद्याबाबत महिला व वकील संघटनांशी चर्चा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:15 AM

- गृहमंत्र्यांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी आणि गतिमान पद्धतीने कार्यवाही ...

- गृहमंत्र्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी आणि गतिमान पद्धतीने कार्यवाही व्हावी, यासाठी प्रस्तावित शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्यातील निमंत्रित महिला तसेच वकील संघटनांसोबत या कायद्यासंदर्भातील विधिमंडळ समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे या बैठका होणार आहेत. ११ जानेवारीला नागपूर तर १९ व २९ तारखेला अनुक्रमे मुंबई व औरंगाबाद येथे या बैठका होतील, अशी माहिती समितीचे अध्यक्ष व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी दिली.

संबंधितांनी आपले मत हे लेखी स्वरूपात आणावे. संबंधित तारखेला तीनही ठिकाणी दुपारी ३ वाजता महिला संघटना तसेच सायंकाळी ५ वाजता वकिलांच्या संघटनेला वेळ देण्यात आली आहे. माता-भगिनी, बालकांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करता यावी, याकरिता ‘शक्ती’ हा कायदा करण्यात येत आहे. हा कायदा अधिक प्रभावी व्हावा याकरिता नागरिकांनी आपल्या सूचना, सुधारणा पाठवाव्यात, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.