शालीमार एक्स्प्रेस प्रकरण; बुलडाण्यातून ‘तो’ प्रतापी प्रियकर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:24 AM2019-06-08T03:24:34+5:302019-06-08T03:24:41+5:30

मोठ्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धडपडीत स्वत:च फसला

Shalimar Express Case; Blondly 'prays' prince's beloved boyfriend | शालीमार एक्स्प्रेस प्रकरण; बुलडाण्यातून ‘तो’ प्रतापी प्रियकर अटकेत

शालीमार एक्स्प्रेस प्रकरण; बुलडाण्यातून ‘तो’ प्रतापी प्रियकर अटकेत

Next

मुंबई : लग्नानंतर सोबत राहण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीच्या पतीला दहशतवादी ठरविण्याचा कट रचणाºया अनंत वानखडे (२८) या तरुणाला बुलडाण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रेयसीच्या पतीला अडकविण्याच्या प्रयत्नात तो स्वत:च कोठडीत गेला. मुंबई तसेच नागपूर दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

मुळचा बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा खुर्द येथील रहिवासी असलेला वानखडे विक्रोळी परिसरात राहतो. प्रेयसीने लग्नानंतर त्याच्याशी संपर्क तोडला. त्याने पोलिसांत धाव घेतली नाही. दोघांचाही एकमेकांवर असलेला विश्वास वानखेडेला खटकत होता. त्यामुळे अखेर त्याने तिच्या पतीला मोठ्या गुन्ह्यात अडकविण्याचे ठरविल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रेयसीला परत मिळविण्यासाठी त्याने, तिच्या पतीलाच दहशतवादी ठरविण्याचा कट रचला. बुधवारी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनन्स रेल्वे स्थानकावर आलेल्या शालीमार एक्स्प्रेसमध्ये बॉम्बसदृश वस्तूसह प्रेयसीच्या पतीचा मोबाइल क्रमांक असलेले धमकीचे पत्र ठेवले होते.

या प्रकरणी मुंबई टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शोध सुरू केला. त्याने एक्स्प्रेसमध्ये ठेवलेल्या मोबाइल क्रमांकामुळेच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले.

प्रत्यक्षात त्याने प्रेयसीच्या पतीला अडकवण्यासाठी त्याचा मोबाइल क्रमांक लिहून ठेवला होता. पण पोलिसांनी याप्रकरणी केलेल्या चौकशीअंती वानखडेनेच हा कट रचल्याचे अखेर उघडकीस आले आहे. त्यानुसार शुक्रवारी मुंबई पोलिसांनी नागपूर एटीएसच्या मदतीने त्याला अटक केली. त्याला रात्री उशिरापर्यंत मुंबईत आणण्यात येणार असून, शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रेयसीच्या पतीलाही त्रास दिल्याचे उघड
वानखडेने सुरुवातीला बनावट फेसबुक अकाउंट तयार करुन प्रेयसीच्या पतीला त्रास देणे सुरू केल्याचे समोर आले आहे. त्यात प्रेयसीसोबत अश्लील व्हिडीओ, फोटो त्याने शेअर केले. पत्नीच्या बदनामीच्या भीतीने पती गप्प होता.

Web Title: Shalimar Express Case; Blondly 'prays' prince's beloved boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.