"अरविंद सावंत अन् नवनीत राणांसारख्या निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 03:10 PM2022-09-11T15:10:41+5:302022-09-11T15:12:02+5:30

आता मनसेनं शिवेसना खासदार अरविंद सावंत आणि खासदार नवनीत राण यांच्यावर निशाणा साधला आहे.

"Shameless politicians like Arvind Sawant and Navneet Rana", MNS Ameya Khopkar on shivsena | "अरविंद सावंत अन् नवनीत राणांसारख्या निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार"

"अरविंद सावंत अन् नवनीत राणांसारख्या निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार"

Next

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे-शिंदे गटात सुरु असलेल्या तणावाचं रुपांतर मारामारीत झाल्याचं दादरमध्ये पाहायला मिळालं. गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी प्रभादेवीत शिंदे गटाचे सरवणकर समर्थक कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. अखेर, पोलिसांच्या मध्यस्थीने वेळीच संघर्ष टळला. मात्र या वादाचे पडसाद पुन्हा उमटले आहेत. त्यातच, खासदार अरविंद सावंत आणि एका पोलिसामध्ये बाचाबाचीही झाली. त्यावरुन, आता मनसेनं शिवेसना खासदार अरविंद सावंत आणि खासदार नवनीत राण यांच्यावर निशाणा साधला आहे. अशा निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्का असो, असे ट्विट मनचिसेच्या अमेय खोपकर यांनी केले आहे. 

दादरमध्ये दोन गटांतील राड्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दादर पोलीस स्थानकात दाखल झाले. पोलीस स्थानकांत दाखल होताच अरविंद सावंत आणि तेथील एका पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. दोनच दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनीही पोलिसांना पोलीस स्थानकात जाऊन चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर, पोलीस पत्नीने संताप व्यक्त करत नवनीत राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आता, खासदार अरविंद सावंत यांचीही पोलिसांसोबत तू-तू मै-मै झाल्याने मनसेनं संताप व्यक्त केला आहे. मनचिसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन या दोन्ही नेत्यांचा धिक्कार असो, असे म्हटले. 
 
पोलिसांचा अपमान करणाऱ्या अरविंद सावंत यांच्यासारख्या खासदाराला अगोदर तुरुंगात डांबलं पाहिजे. पोलिसांचा असा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. नवनीत राणा, अरविंद सावंतांसारख्यांना कधीच जबाबदार राजकारणी म्हणू शकत नाही. अशा निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार, असे ट्विट खोपकर यांनी केली आहे. 
तसेच, पोलिसांना अरेरावी करणाऱ्या आणि पोलिसांना अपमानित करणाऱ्या खासदार अरविंद सावंत यांना त्वरित अटक करावी, अशी मागणीही अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन केली आहे. 


  
शिवसेना आणि शिंदे गटात राडा

प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. दादर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्याची गर्दी झाली होती. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शिंदे गटाच्या संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. 

सावंतांनी माध्यमांशी साधला संवाद

पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार सदा सरवणकर यांनी दोन ठिकाणी गोळीबार केला. त्याच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली. तसेच योग्य कारवाई न केल्यास खरी शिवसेना दाखवून देऊ, असा इशारा देखील अरविंद सावंत यांनी यावेळी दिला. तक्रार करण्यासाठी दाखल झालेल्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे?, असा सवाल अरविंद सावतं यांनी उपस्थित केला. शिंदे गटाकडून गुंडागिरी सुरु आहे. सोशल मीडियावरुन शिवसेनेची बदनामी केली जातेय, असा दावाही अरविंद सावंत यांनी यावेळी केला.
 

Web Title: "Shameless politicians like Arvind Sawant and Navneet Rana", MNS Ameya Khopkar on shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.