शांघाई टनेल इंजिनियरिंग समूह करणार मुंबई मेट्रो ३ च्या टनेल व्हेंटिलेशन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणालीची उभारणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 05:25 PM2019-02-18T17:25:24+5:302019-02-18T17:25:43+5:30

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ) अंतर्गत टप्पा-१ च्या आरे डेपो ते बीकेसी स्थानकांच्या वायू विजन यंत्रणेची (टनेल व्हेंटिलेशन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणाली) यंत्रणेच्या उभारण्यासाठी "शांघाई टनेल इंजिनियरिंग लिमिटेड" या समूहाची निवड करण्यात आली आहे.

Shanghai Tunnel Engineering Group will construct the Mumbai Metro 3 Tunnel ventilation and environmental control system | शांघाई टनेल इंजिनियरिंग समूह करणार मुंबई मेट्रो ३ च्या टनेल व्हेंटिलेशन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणालीची उभारणी 

शांघाई टनेल इंजिनियरिंग समूह करणार मुंबई मेट्रो ३ च्या टनेल व्हेंटिलेशन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणालीची उभारणी 

googlenewsNext

मुंबई - मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ) अंतर्गत टप्पा-१ च्या आरे डेपो ते बीकेसी स्थानकांच्या वायू विजन यंत्रणेची (टनेल व्हेंटिलेशन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणाली) यंत्रणेच्या उभारण्यासाठी "शांघाई टनेल इंजिनियरिंग लिमिटेड" या समूहाची निवड करण्यात आली आहे. ही निवड आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रियेद्वारे जायकाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आली आहे. 

"शांघाई टनेल इंजिनियरिंग लिमिटेड समूह" मेट्रो ३ च्या आरे डेपो ते बीकेसी मेट्रो स्थानकांदरम्यानच्या  वायू विजन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणाली यंत्रणेचे काम करणार आहेत ज्यामध्ये संपूर्ण यंत्रणेचे आरेखन, उत्पादन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंग अशा प्रकारची कामे करणार आहेत.

वायू विजन यंत्रणा (टीव्हीएस) ही महत्वपूर्ण जीवन सुरक्षा प्रणाली आहे जी आपत्काळी प्रवाशांना आग आणि धुर यांसारख्या समस्येपासून जास्तीत जास्त संरक्षण करेल. भविष्यात मेट्रो स्थानकामध्ये रहदारी वाढली तरीही स्थानकामध्ये योग्य ते तापमान आणि हवा राखून ठेवण्याचे सामर्थ्य या यंत्रणेमध्ये असणार आहे   

पर्यावरण नियंत्रण प्रणाली यंत्रणेद्वारे मुंबई मेट्रो ३ स्थानकामध्ये प्रवाशांना श्वसनासाठी ताजी हवा मिळणे शक्य होणार आहे, अनावश्यक वायू जसे कार्बनडाय ऑक्साइडला नियंत्रित करून मेट्रो स्थानकात वातानुकूलित वातावरण निर्माण केले जाणार आहे.

या प्रसंगी मुं.मे.रे.कॉ. च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, " भविष्यात वायू विजन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणालीमुळे मेट्रो ३ मार्गिकेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे. मेट्रो-३ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या अद्यावत वायू व्हिजन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणालीची उभारणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत"

Web Title: Shanghai Tunnel Engineering Group will construct the Mumbai Metro 3 Tunnel ventilation and environmental control system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.